३ मित्र, एक रोड ट्रिप आणि एक अविस्‍मरणीय प्रवास!

    13-Aug-2021
Total Views | 130

Shantit Kranti_1 &nb
 
मुंबई : आपण जीवनामध्‍ये पुढे जात असताना खरे मित्र आपले आधारस्‍तंभ बनतात, आपल्‍या अनुभवांमध्‍ये मोलाची भर करतात, आपले जीवन अविरत आठवणींनी भरून टाकतात. मैत्रीच्‍या या अतूट नात्‍याला प्रशंसित करत सोनीलिव्‍ह १३ ऑगस्‍ट रोजी हृदयस्‍पर्शी मराठी ओरिजिनल 'शांतीत क्रांती' दाखवण्‍यास सज्‍ज आहे. ही सिरीज प्रत्‍येक मैत्रीमध्‍ये आवश्‍यक असलेला समजूतदारपणा व उद्देशावर प्रकाश टाकते. ही कथा ३ जिवलग मित्र श्रेयस, दिनार व प्रसन्‍न यांच्‍या विलक्षण साहचर्याला दाखवते. हे तिघेही स्‍वयं-शोधाच्‍या प्रवासावर जातात, जो नकळतपणे त्‍यांच्‍या जीवनाला कायमस्‍वरूपी कलाटणी देतो.
 
 
कथा श्रेयस, दिनार व प्रसन्‍न यांच्‍यामधील अतूट नात्‍याला सादर करते. कायमस्‍वरूपी तरूण व काळजी-मुक्‍त असण्‍याची इच्‍छा असलेल्‍या या तिघांचा हा प्रवास त्‍यांच्‍या मैत्रीला आव्‍हान करतो. यामधून आत्‍मपरीक्षण व साक्षात्‍काराच्‍या प्रवासाला सुरूवात होते, जो निश्चितच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल. चढ-उतार, ट्विस्‍ट्स व वळण आणि जीवनाशी संबंधित शिकवण या सिरीजला पाहण्‍यासाठी सर्वागीण व अविस्‍मरणीय बनवतात.
 
 
धमाल, मौजमज व मैत्रीव्‍यतिरिक्‍त 'शांतीत क्रांती' ही प्रेक्षकांना विचार करण्‍यास भाग पाडणारी सिरीज असेल. ही सिरीज त्‍यांना आठवण करून देईल की गंतव्‍य नाही तर प्रवास महत्त्वाचा असतो. विनोदी स्‍वरूपात सिरीज जीवनातील चढ-उतारांचा सामना करण्‍याच्‍या पद्धतींना दाखवते. श्रेयस नात्‍यामधील आव्‍हानांशी सामना करत असतो, प्रसन्‍न पूर्ण न झालेल्‍या स्‍वप्‍नांच्‍या तणावाचा सामना करत असतो आणि दिनार जीवनातील अनपेक्षित गोष्‍टींचा सामना करत असतो. ही सिरीज हलक्‍या–फुलक्‍या पद्धतीने या पात्रांच्‍या पुढे जाणा-या जीवनप्रवासाला सादर करते.
 
 
लोकप्रिय यूट्यूब मराठी पेज 'भारतीय डिजिटल पार्टी' (भाडिपा)चे संस्‍थापक सारंग साठये व पौला मॅकग्‍लीन दिग्‍दर्शित 'शांतीत क्रांती' परिपूर्ण फ्रेण्‍डशीप डे ऑफरिंग असून सोनीलिव्‍हवर १३ ऑगस्‍ट २०२१ पासून पाहता येईल. ही सिरीज हिंदी, तमिळ, तेलुगु व मल्‍याळममध्‍ये डब करण्‍यात आली आहे.
 
 
या सिरीजमध्‍ये अभय महाजन (श्रेयस), ललित प्रभाकर (प्रसन्‍न) व आलोक राजवाडे (दिनार) हे प्रमुख भूमिकेत असून विजय निकम व लोकप्रिय बॉलिवुड अभिनेत्री शिखा ताल्‍सानिया हे देखील मुख्‍य भूमिकेत आहेत. सखी गोखले, मृण्‍मयी गोडबोले, अमेय वाघ, सारंग साठये, जितेंद्र जोशी हे कलाकार या सिरीजध्‍मये स्‍पेशल उपस्थिती दर्शवणार आहेत.
 
 
"सोनीलिव्‍ह प्रेक्षकांसाठी भारताच्‍या वास्‍तविक व संबंधित कथा सादर करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे. आम्‍ही आमच्‍या प्रादेशिक कन्‍टेन्‍टची श्रेणी अधिक प्रबळ करत असताना आम्‍हाला दोन कन्‍टेन्‍ट पॉवरहाऊसेस टीव्‍हीएफ आणि भाडिपासोबत सहयोगाने आमची पहिली मराठी ओरिजिनल 'शांतीत क्रांती'ची घोषणा करण्‍याचा अभिमान वाटतो. ही सिरीज आजच्‍या शहरी तरूणांमध्‍ये अधिक प्रमाणात दिसून येणा-या मैत्रीच्‍या ख-या साराला सादर करते. 'शांतीत क्रांती' अपवादात्‍मक प्रबळ व्‍यक्तिरेखांना दाखवते. प्रतिभावान कलाकारांनी या व्‍यक्तिरेखा साकारल्‍या आहेत. या सिरीजची पटकथा लक्षवेधक आहे.''
 
- आशिष गोलवलकर, प्रमुख - कन्‍टेन्‍ट, एसईटी व डिजिटल बिझनेस 
''आम्‍हाला प्रादेशिक कन्‍टेन्‍ट सादर करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी असलेले व्‍यासपीठ सोनीलिव्‍ह सोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. 'शांतीत क्रांती' ही पडद्यावर सादर करण्‍यात आलेली प्रत्‍येकाची कथा आहे. आम्‍हाला खात्री आहे की, सर्व भौगोलिक क्षेत्रांमधील प्रेक्षक या सिरीजशी संलग्‍न होतील. कथा, अनुभव, हास्‍य आणि त्‍यामधून मिळणारा संदेश या सिरीजला पाहण्‍यासाठी अत्‍यंत रोमांचक बनवतात. आम्‍ही प्रेक्षकांना 'शांतीत क्रांती'सह आरामात मनोरंजनाचा आनंद घेताना पाहण्‍यासाठी उत्सुक आहोत.''
 

- दिग्‍दर्शक, सारंग साठये व पौला मॅकग्‍लीन
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121