यंदा राज्यात इतके टक्के पाऊस पडणार; हवामान खात्याने दिली माहिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2021
Total Views |

MONSOON _1  H x


मुंबई (प्रतिनिधी) -
भारतीय हवामान विज्ञान विभागाकडून (IMD) मान्सूनच्या पावसासाठी यंदाच्या पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. नैऋत्य मोसमी मान्सून हंगामातील जून ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत यंदा ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज 'आयएमडी'ने वर्तवला आला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.
 
 
१९६१ ते २०१० कालावधीत देशाची मान्सून पाऊसाची सरासरी ८८० मिलीमीटर असून सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंदाच्या मान्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४० टक्के) तर दुष्काळाची शक्यता १४ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाज दर्शविणाऱ्या नकाशानुसार यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के असल्याचे दर्शविण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नैऋत्य मोसमी मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त करण्यात येईल.

@@AUTHORINFO_V1@@