विशाखापट्टनमच्या हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळून ११ ठार

    दिनांक  01-Aug-2020 17:13:23
|

VIshakhapatanam_1 &n
विशाखापट्टनम : विशाखापट्टनम येथील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये शनिवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात ११ कामगारांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी आहेत. 'हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड'मधील अवाढव्य क्रेन अचानक कोसळल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. तसेच, ही घटना सीसीटीव्हीमध्येदेखील कैद झाली आहे.
 
 
 
वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, डीसीपी सुरेश बाबू यांनी घटनेबद्दल माहिती देताना क्रेन अपघातात १० जण ठार झाल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर मृतांचा आकडा हा ११ झाला आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अद्यापही काही लोक क्रेनखाली अडकले असण्याची शक्यता आहे. जखमींना जवळच्या उपचारांसाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.