अखेर दहावीचा निकाल लागणार !

    28-Jul-2020
Total Views |

SSC_1  H x W: 0
 
 
मुंबई : कोरोनामुळे स्थगित असलेला दहावीचा निकाल अखेर २९ जुलैला जाहीर होणार असून दुपारी १ वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. मार्च २०२० मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा पार पडली होती. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा निकाल उपलब्ध असणार आहे.
 
 
 
 
 
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय केली आहे. तसेच बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन ५७७६६ वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
दरवर्षी ३ ऑक्टोबरला

दरवर्षी ३ ऑक्टोबरला 'अभिजात मराठी भाषा दिवस' - भव्य-दिव्य आयोजन होणार; आठवडाभर व्याख्याने, प्रदर्शने, विविध स्पर्धांचे नियोजन

मराठी भाषेला मिळालेला 'अभिजात' दर्जा केवळ कागदोपत्री न राहता, जनमानसात रुजवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठीच्या गौरवशाली अडीच हजार वर्षांच्या परंपरेचा जागर करण्यासाठी, आता दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' देखील साजरा केला जाईल, असे मराठी भाषा विभागाने शुक्रवारी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि संशोधनाला गती मिळणार..

भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा; आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत

भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा; आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत

नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. ४ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली...

बाजीराव पेशवे यांच्या युद्धनिती अंगिकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित : अमित शहा एनडीएमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूप पुतळ्याचे अनावरण

बाजीराव पेशवे यांच्या युद्धनिती अंगिकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित : अमित शहा एनडीएमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूप पुतळ्याचे अनावरण

"छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली त्यातून स्वराज्याचे संस्कार पेरले. ही ज्योत छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी, तानाजी यांनी तेवत ठेवली. हीच परंपरा पुढे चालवत थोरले बाजीराव पेशवे यांनी स्वराज्याची मशाल पेटती ठेवली. युद्ध कौशल्याच्या माध्यमातून स्वराज्याची सीमा विस्तारण्याचे मोठे कार्य पेशवे यांनी केले आहे. मातृभूमी, धर्मभूमी आणि स्वराज्यासाठी सातत्याने युद्ध करणारे ते एकमेव अजेय आणि पराक्रमी योद्धा आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121