जामिया-न्यू फ्रेंड्स कॉलनी हिंसा : दिल्ली पोलिसांनी दाखल केले आरोपत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2020
Total Views |
sharjeel_1  H x






शरजील इमामवर दंगल भडकवण्याचे आरोप 


नवी दिल्ली : जामिया-न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात झालेल्या निषेधाच्या वेळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात शरिजील इमामवर दंगल भडकवण्याचा आरोप करण्यात आला आहे.


न्यायालयात मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी गुरमोहन कौर यांच्याकडे आरोपपत्र दाखल करताना पोलिसांनी पुरावे म्हणून सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि १०० हून अधिक साक्षीदारांचे नोंदविण्यात आलेले जबाब सुपूर्द केले आहेत. देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शारिजील इमामला कोर्टाने ३ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


१५ डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामिया जवळील न्यू फ्रेंड्स कॉलनी येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या निषेधाच्यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये हिंसाचार वाढला होता. दरम्यान, आंदोलकांनी चार बस आणि पोलिसांच्या दोन वाहनांना आग लावली. विद्यार्थी, पोलिस कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह सुमारे ६० जण जखमी झाले.
@@AUTHORINFO_V1@@