लातूर : रात्रीच्या वेळेस घरात घुसून वयोवृद्ध जोडप्याची निघृण हत्या करून दागिने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये गळसुली भागात उघडकीस आली. चोराने वयोवृद्ध महिलेच्या डोक्यात कूकर घालून तीची निघृण हत्या केली, तर पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने या तिच्या नवऱ्याला विहीरीत ढकलून दिले.
पोलीसांनी या चोरट्याला १२ तासात अटक केली. तपासात उघड झालेल्या माहीतीनुसार, लातूर गळसुली गावातील शेतात राहणाऱ्या जोडप्याची निघृण हत्या चोरीच्या उद्देशानेच केली होती. त्यांच्याकडील दागिने चोरी केले. आधी चोराने आजीच्या डोक्यात कूकर घातला आणि मग दगडाने डोके ठेचून तिची हत्या केली. तर आपण केलेल्या क्रुर कृत्याचा पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने महिलेच्या नवऱ्याला चोराने विहीरीत ढकलले.
यात दाम्पत्याचा अंत झाला. पुष्पलता कातळे (वय ५२) व रावसाहेब कातळे (वय ६३ ) अशी या चोराने हत्या केलेल्यांची नावे आहेत. हे दोघे लातूरच्या गळसुली गावातील आपल्या शेतात राहत होते. या हत्याकांडाने लातूर जिल्हा हादरला आहे. तर हत्या करणारा आरोपी हा गावातील असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.