ज्येष्ठ तबलावादक पं. भाई गायतोंडे यांचे निधन

    दिनांक  28-Jun-2019
ठाणे : ज्येष्ठ तबलावादक पं. भाई गायतोंडे यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. भारतीय संगीतातील गुरुतुल्य आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. लखनऊ, दिल्ली येथील अनेक विद्यापीठांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांमध्ये ते मानद व्याख्याते म्हणून कार्यरत होते.

 

ज्येष्ठ तबलावादक म्हणून त्यांची ख्याती होती. पं. भाई गायतोंडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने; तसेच मृदंगाचार्य शंकरभैय्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तबला वादन या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. आजपर्यंत त्यांनी तब्बल अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांना तबल्याचे निःशुल्क प्रशिक्षण दिले दिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat