वेव्हज २०२५ क्रिएटोस्फीअर : 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'मधून कल्पकतेचा आविष्कार

    01-May-2025   
Total Views | 8
 
creatosphere at waves 2025 innovating through create in india challenges
 
मुंबई : (Create in India Challenge - CreatoSphere at WAVES 2025) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आज म्हणजेच गुरुवार दि. १ मे पासून सुरू झालेल्या चार दिवसीय जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (WAVES 2025) अंतर्गत प्रमुख उपक्रम म्हणून सुरु करण्यात आलेल्‍या 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'च्या (सीआयसी) पहिल्या पर्वाची अंतिम फेरी होणार आहे. 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज'साठी जवळपास एक लाख सहभागींच्या नोंदणी प्राप्त झाल्या आहेत. या चॅलेंजसाठी साठहून अधिक देशांमधून प्रवेशिका आल्‍या आहेत. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ७५० स्पर्धकांना ‘क्रिएटोस्फीअर’मध्ये आपले सर्जनशील कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे.
 
‘क्रिएटोस्फीअर’ हे एक विशेष व्यासपीठ असून, अ‍ॅनिमेशन, कॉमिक्स, एआय, एक्सआर, गेमिंग, संगीत आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी यांसारख्या क्षेत्रातील नवोन्मेषाचा संगम येथे अनुभवता येईल. येथे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभावंत कल्पनाशक्ती, प्रयोगशीलता आणि कलात्मक उत्कृष्टतेचे दर्शन घडवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे – ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’. सीआयसीने पहिल्याच पर्वात अकराशेहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवेशिकांसह जागतिक स्वरूप प्राप्त केले आहे. भारतातील २८ राज्ये, ८ केंद्रशासित प्रदेश आणि २० पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधित्व यात आहे.
 
 
 
 
चार दिवसांच्या या परिषदेत मास्टरक्लासेस, पॅनेल चर्चा, कार्यशाळा, सादरीकरणे आणि प्रदर्शने होणार आहेत. व्हर्च्युअल लोक, अॅनिमेशन अॅली, गेम ऑन, म्युझिक मॅनिया यांसारख्या नऊ विभागांमध्ये विविध क्षेत्रांतील सर्वोत्तम कामगिरी सादर होईल. या वेळी 'वेव्हज क्रिएटर पुरस्कार' समारंभ होणार असून, विजेत्यांना रेड-कार्पेट कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. सेलिब्रिटी, नामवंत कलाकार व उद्योगातील अग्रणी व्यक्तींच्या उपस्थितीत, क्रिएटिव्ह चॅम्पियन्सना गौरवण्यात येणार आहे. वेव्हजच्या केंद्रस्थानी असलेला हा उपक्रम भारताच्या सर्जनशील महत्त्वाकांक्षेची सशक्त अभिव्यक्ती म्हणून उदयाला आला असून, जागतिक प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगात देशाचे वाढते नेतृत्व अधोरेखित करणार आहे अशा प्रकारे, क्रिएटोस्फीअर हे नवोन्मेषाचे केंद्र आणि भारताच्या सर्जनशीलतेचा जागतिक उत्सव ठरेल.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121