ममता सरकारचा राम नवमी मिरवणुकीच्या परवानगीस विरोध

    03-Apr-2025
Total Views | 24

Ram Navami
 
कोलकाता : प.बंगाल राज्यातील कोलकाता हावडा पोलिसांनी अंजनी पुत्र सेनेला राम नवमी (Ram Navami) साजरी करू दिली नाही. तर दुसरीकडे याच पोलिसांनी ईद दिवशी मुस्लिम बांधवांना मिरवणुकीची परवानगी दिली होती. राम नवमी साजरी करताना त्यांना रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास विरोध दर्शवण्यात आला होता. २०२२ आणि २०२३ मध्ये जातीय हिंसाचार झाला होता, त्यामुळे गेल्या वर्षीही मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले होते.
 
पोलिसांनी असा युक्तीवाद केला की, १७ एप्रिल २०२४ रोजी मिरवणुकीदरम्यान कोलकाता उच्च न्यायालयाने लादण्यात आलेल्या गटाने उल्लंघन केल्याचे आढळून आले होते, तथापि, मिरवणूक आयोजित करण्यासाठी दोन पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. मात्र, हा परिसर मिरवणुकीसाठी संवेदनशील परिस्थिती असल्याचे कारण सांगून पोलीस प्रशासनाने ६ एप्रिल रोजी मिरवणुकीला परवानगी देण्यास नकार दिला. गेल्या वर्षीही त्यांनी हेच कारण सांगत मिरवणूक आयोजित करण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली आणि शांततेत मिरवणूक काढण्यात आली होती.
 
 
 
त्यानंतर ते म्हणाले की, ईदच्या दिवशी अनेक लोक रस्त्यावर उतरून नमाज अदा करतात. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना होत नाही. परंतु जेव्हा रामनवमी असते तेव्हा प्रशासनाला अडचण निर्माण होऊ शकते. दरवर्षी ते मिरवणूक थांबवण्यास आक्षेप घेतात. आम्ही न्यायालयात याबाबत अपील करू आणि परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करू.
 
दरम्यान, प.बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राज्यात रामनवमी शांततेच साजरी करण्यासाठी तृणमूल काँग्रेस सरकारला खबरदारीचे उपाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुरूवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. संबंधित प्रकरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. ज्यामुळे राम भक्तांचा संताप झाला असता. तसेच हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या, अशातच आता ६ एप्रिल २०२५ रोजी राम नवमी साजरी केली जाणार आहे. याला न्यायालयात अपील केल्यानंतर न्यायालय काय निर्णय देईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121