आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

    26-Apr-2025
Total Views | 27
 
Rahul Gandhi Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "भारतीय स्वातंत्र्याच्या रणभूमीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याच्या अंधाऱ्या काळकोठडीतून विचारांचा प्रकाश दिला. त्या महापुरुषांवर राहुल गांधींनी ब्रिटिशांचा सेवक अशी टीका करत आपल्या वैचारिक दारिद्र्याची आणि इतिहासद्रोहाची पातळी दाखवून दिली होती."
 
"आता सुप्रीम कोर्टानं जी झणझणीत कानउघाडणी केली ती योग्यच आहे. ही फटकार केवळ न्यायालयीन नाही तर राष्ट्रभावनेचीच प्रतिक्रिया आहे. त्यामुळे आता तरी त्यांचं डोकं ताळ्यावर येईल. अशी अपेक्षा आहे. राहुल गांधींनी आणखी एक लक्षात घ्यावं की, शब्द हे शस्त्र असतात आणि शस्त्र हाताळताना विवेक हवा. अन्यथा ते तुम्हाला जखमी केल्याशिवाय राहत नाहीत," असा सल्लाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींना दिला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विमान अपघातानंतर माध्यमांच्या वार्तांकनांमुळे अपघातग्रस्तांच्या कुटूंबियांना भावनिक ठेच पोहोचल्याचा आरोप!

विमान अपघातानंतर माध्यमांच्या वार्तांकनांमुळे अपघातग्रस्तांच्या कुटूंबियांना भावनिक ठेच पोहोचल्याचा आरोप!

विमान अपघातांनंतर माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनाबद्दल नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका शुक्रवार दि.१८ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयात कोइम्बतूर येथील वकील एम. प्रवीण यांनी दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121