वक्फ बोर्डाचा मनमानी काराभार कायमच, शिवलिंगावर केला दावा

    05-Mar-2025
Total Views | 27

Waqf Board
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) मनमानी कारभाराने पुन्हा एकदा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावेळी कट्टरपंथीने हिंदूबहुल भागात असलेल्या गावांमध्ये हिंदू देवी देवतांवर दावा केला आहे. एवढेच नाहीतर त्यानी गावात असेलल्या शिवलिंगावरही आपली मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. वक्फ बोर्डाने ग्रामस्थांना नोटीशी पाठवून म्हटले की, जे लोग संबंधित जागेवर वास्तव्य करत आहेत ती जागा वक्फ बोर्डाची आहे. त्यांनी ती जागा रिकामी करावी, असा दावा केला.
 
एका वृत्तानुसार, वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे की, माखनी गावातील संबंधित जमीन स्मशानभूमीची आहे. जमिनीच्या मालकीचा कोणताही पुरावा दाखवण्यात आलेला नाही ही वेगळी बाब आहे. वक्फने ३ एकर जमिनीचा ताबा असल्याचा दावा केला आहे. गावकऱ्यांची घरे, शेत, प्लॅटफॉर्म आणि अगदी शिवलिंगही वक्फचीच मालमत्ता असल्याचे घोषित करण्यात आले आहे, अशा सूचना मिळाल्यानंतर लोक आता चिंतेत आले आहेत.
 
आश्चर्याची बाब म्हणजे सरकारी नोदींमध्ये संबंधित जमीन ही सरकारची आहे. तरीही वक्फ ती जागा स्वत:ची असल्याचा दावा करत आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की, हे गाव कादर खान नावाच्या व्यक्तीचे होते. ज्याने जमीन दान केली होती. पण गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, तो इथे कधीच वास्तव्यास नव्हता. अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी राहणाऱ्या हिंदू कुटुंबांनी स्पष्टपणे सांगितले की, ते त्यांची जमीन सोडणार नाहीत आणि वक्फच्या कृतीविरूद्ध लढतील, लोकांमध्ये संताप आहे कारण त्यांची घरे त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावरही दावा करण्यात आला आहे.
 
वक्फ बोर्डात सुधारणा करण्यासाठी भारत सरकार वक्फ दुरूस्ती विधेयक आणण्याची तयारी करत आहे. परंतु वक्फ बोर्डाची मनमानी थांबायची चिन्हे दिसत नाहीत.
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121