देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालकांचे आरोग्य महत्वाचे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

    01-Mar-2025
Total Views | 25
 
Ajit Pawar
 
पुणे : बालकांचे आरोग्य एखाद्या कुटुंबापुरते मर्यादित नसून ते समाज आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याकरीता महत्वाचे असते. त्यामुळे राज्यातील बालके सदृढ असली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
 
शनिवार, १ मार्च रोजी औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ आणि राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे दूरदृष्यप्रणीलीद्वारे उपस्थित होते. तर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर उबाठा गटाचा दावा! काय म्हणाले संजय राऊत?
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "प्रत्येक बालकांचे आरोग्य आणि उज्ज्वल भविष्याची जबाबदारी राज्य शासन पूर्ण निष्ठेने पार पाडेल. सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगर विकास विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत ६ हजार शाळांमधील १४ लाख विद्यार्थी आणि ३० हजार अंगणवाडीतील २० लाख बालकांची डोक्यापासून ते नखा पर्यत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे."
 
"बालकांचे आरोग्य एखाद्या कुटुंबापुरते मर्यादित नसून ते समाज, देशाच्या उज्ज्वल भविष्याकरीता महत्वाचे असते. त्यामुळे राज्यातील बालके सदृढ असली पाहिजे, त्यांचे आरोग्य चांगले असले पाहिजे, अभ्यासात प्राविण्य मिळवले पाहिजे, यादृष्टीने सुदृढ आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम करायला हवे. बालकांना जन्मजात कुपोषण, ॲनेमिया, डोळे व दाताचे आजार, हद्यरोग, कुष्ठरोग आदीप्रकारचे आजार असतात त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते, या मोहिमेचा माध्यमातून अशा बालकांवर शासकीय रुग्णालय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टराद्वारे वेळेत उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने गरजू बालकांना मोठ्या प्रमाणावर याचा लाभ होणार आहे," असे त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121