१० दिवसात सिंधुदुर्गातून सूक्ष्म सागरी जीवांच्या ७० प्रजातींची नोंद; 'या' किनाऱ्यांवरुन केली नोंद

    26-Feb-2025
Total Views | 131
sindhudurg intertidal zone
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'इंडिया इंटरटायडल बायोब्लिट्झ' या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्गातील खडकाळ किनाऱ्यावरुन समुद्री जीवांच्या ७० प्रजातींची नोंद करण्यात आली आहे (sindhudurg intertidal zone). अवघ्या दहा दिवसांमध्ये ओहोटीच्या वेळा सांभाळून जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या खडकाळ किनाऱ्यांवरुन या नोंदी करण्यात आल्या (sindhudurg intertidal zone). त्यामुळे या नोंदी जिल्ह्यातील सागरी जैवविविधता नोंदणीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या ठरल्या आहेत. (sindhudurg intertidal zone)
 
 
किनाऱ्यावरील भरती आणि आहोटीच्या दरम्यान येणारा प्रदेश जैवविविधतेने समुद्ध असतो. या प्रदेशाला आंतरभरती प्रदेश असे म्हटले जाते. या प्रदेशामध्ये वालूकामय किनारे, खडकाळ किनारे, दलदलयुक्त जमीन अशा काही अधिवासांचा समावेश होतो. या अधिवासामध्ये अनेक अपृष्ठवंशी आणि कंठकचर्मी सूक्ष्म जीव अधिवास करत असतात. उदा. समुद्री गोगलगायी, समुद्री काकडी, स्टारफिश, शंख, शिंपले इत्यादी. अशा सूक्ष्म जीवांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी २६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२५ 'इंडिया इंटरटायडल बायोब्लिट्झ' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत 'नॅचरलिस्ट फाऊंडेशन'कडून सिंधुदुर्गातील खडकाळ किनाऱ्यांवर निरीक्षणाचे काम करण्यात आले.
 
 
'नॅचरलिस्ट फाऊंडेशन'चे सचिन राणे आणि किमया गजरे यांनी २५ ते ३० जानेवारी या दरम्यान जिल्ह्यातील चार खडकाळ किनाऱ्यांवर निरीक्षणाचे काम केले. मिठमुंबरी (देवगड), तांबळडेग (मीठबाव), कुणकेश्वर, रॉक गार्डन (मालवण) या चार किनाऱ्यांवर निरीक्षण करण्यात आले. यावेळी टायगर रिबन वर्म, वर्म स्नेल असे काही अपृष्ठवंशीय जीव आणि एलिसिया हिरासी, स्क्रिबल न्युडिब्रँच, स्यूडोसेरॉस स्टिम्पसोनी, थायसानोझून, वर्टी स्लग या समुद्री गोगलगायींच्या काही प्रजातींची नोंद करण्यात आली. सिंधुदुर्गतील खडकाळ किनाऱ्यांमध्ये अधिवास करणाऱ्या सागरी जीवांच्या दीर्घकालीन निरीक्षणाची गरज सचिन राणे यांनी बोलून दाखवली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121