मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (golden opportunity for prisoners) महाकुंभात पवित्र स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो, यावर अनेकांचा विश्वास आहे. या भावनेने देश भरातून भाविक प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभात उपस्थित होताना दिसतायत. अशातच आता कारागृहात बंद असणाऱ्या कैदींनाही त्रिवेणी संगमच्या पाण्याने स्नान करून पापमुक्त होण्याची संधी मिळणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्य कारागृह प्रशासन संगमावरून पवित्र पाणी आणण्यासाठी विशेष व्यवस्था करत आहे.
हे वाचलंत का? : महाकुंभाची तारीख मार्चपर्यंत वाढवली? काय आहे नेमकं सत्य?
मिळालेल्या माहितीनुसार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते १० या वेळेत हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज्यभरातील सर्व ७५ तुरुंगांमध्ये बंदिस्त असलेल्या कैद्यांना संगमावरून आणलेल्या पाण्यात आंघोळ करण्याची परवानगी दिली जाईल. यामध्ये सात मध्यवर्ती कारागृह आणि ६८ जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. संगमावरून आणलेले पाणी हे नियमित आंघोळीच्या पाण्यात मिसळले जाईल कैदींना पवित्र स्नानाचा आनंद घेता येईल. सध्या उत्तर प्रदेशच्या तुरुंगात ९० हजारहून अधिक कैदी बंदीवासात असून हजारो कैदी पवित्र स्नानासाठी उत्सुक असल्याची माहिती आहे.