'बसपोर्ट' व्यापार आणि प्रवासी दळणवळणाचा सुंदर मिलाफ

गुजरात परिवहनच्या अनोख्या उपक्रमाचे मंत्री सरनाईक यांच्याकडून कौतुक

    19-Feb-2025
Total Views | 19

gujrat bus port




गांधीनगर, दि.१९ : वृत्तसंस्था गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी व्यापारी संकुल उभारत त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा युक्त असलेले "बसपोर्ट" निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणचा सुंदर मिलाफ केला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेताना बोलत होते.

राज्याचे परिवहन मंत्री गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुजरात मधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार आणि अधिकारी असे शिष्टमंडळ देखील या दौऱ्यात सहभागी आहे. या दौऱ्याच्या दरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा करण्यात आली.गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती . इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का ? याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली आहे.

यावेळी गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नागार्जन यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या परिवहन सेवेची माहिती दिली. त्यामध्ये गुजरात परिवहन महामंडळ मार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणालीची माहिती, बसस्थानकावर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा संबंधित माहिती अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाने दिली. गुजरात प्रशासनाने बसस्थानकावर थोड्यावेळ विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना कमी किंमतीमध्ये 'प्रवासी विश्रांतीगृह' उपलब्ध करून दिले आहे, या सुविधेचे मंत्री सरनाईक यांनी कौतुक केले .तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक बसेसची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली.
अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121