मुंबई (विशेष प्रतिनिधी) – पश्चिम घाटामधून चतुराच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे (new species of dragonfly). नव्याने शोधण्यात आलेल्या चतुरांपैकी एक चतुर हा केरळराज्यातील थिरूवनंतपुरम जिल्ह्यातील असून दुसरा चतुर हा महाराष्ट्र राज्यातीलसिंधुदुर्ग जिल्ह्यातून शोधण्यात आला आहे (new species of dragonfly). केरळ मधल्या चतुराचे नामकरण मेरोगोम्फसआर्यानाडेन्सिस (Merogomphus aryanadensis) असे करण्यात आले असून,महाराष्ट्रातील चतुराला मेरोगोम्फसफ्लॅवोरिडक्टस (Merogomphus flavoreductus) असे नाव देण्यात आले आहे (new species of dragonfly). या दोन्ही प्रजाती चतुरांच्यागॉम्फिड (Gomphid) कुळातील असून ते त्यांच्या काळ्या-पिवळ्या शरीरामुळे आणिशेपटीकडील उपंगांच्या शस्त्रासारख्या आकारामुळे ओळखले जातात. (new species of dragonfly)
पश्चिम घाट हाजैवविविधतेचा 'हॉटस्पॉट' म्हणून जगात प्रसिद्ध आहे. पश्चिम घाटात चतुर (dragonflies)आणि टाचण्या (damselflies)यांच्या सुमारे २०० प्रजाती आढळतात.त्यात दरवर्षी नवनवीन प्रजातींची भर पडते. नुकताच शास्त्रज्ञांनी येथून दोन नवीनचतुरांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. केरळमधून विवेक चंद्रन,रेजी चंद्रन,डॉ. सुबीन जोस, महाराष्ट्रामधून डॉ. दत्तप्रसादसावंत, डॉ. पंकज कोपर्डे आणि बंगळुरू मधून डॉ. कृष्णमेघ कुंटे याचमूने ही लक्षवेधी कामगिरी केली आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी झूटॅक्सा या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. पश्चिम घाटात याआधी मेरोगोम्फस चतुरांच्या केवळ २ प्रजाती ज्ञात होत्या. यात आता आणखी दोन प्रजातींची भर पडली असून या चारही प्रजाती पश्चिम घाट प्रदेशनिष्ठ प्रजाती आहेत.
मेरोगोम्फस आर्यानाडेन्सिस चा शोध केरळमधील थिरूवनंतपुरमजिल्ह्यातील आर्यानाड या गावी लागला. २०२० साली या भागातील कारामाना नदीजवळच्याएका छोट्या ओढ्याजवळ रेजी चंद्रन यांना हा चतुर दिसला होता. मात्र ही जागापेप्पारा अभयारण्याच्या जवळ असल्याने येथे हत्तींचे आगमन झाले आणि पुढची दोन वर्षेरेजी यांना हा चतुर पाहणे शक्य झाले नाही. मात्र फोटोंचे नीट निरीक्षण केल्यावर हीप्रजात इतर मेरोगोम्फस पेक्षा खूपच वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.त्यांनी हे थ्रिसूर येथील चतुर अभ्यासक विवेक चंद्रन यांच्या निदर्शनास आणून दिलेआणि शेवटी ऑगस्ट २०२४ मध्ये या चतुराचे दोन नमुने पकडण्यात त्यांना यश आले. हीप्रजात इतर मेरोगोम्फस पेक्षा खूपच लहान होती आणि नराच्या शेपटीकडील उपांगांचाआकार हा एखाद्या समांतर जबडे असलेल्या पक्कडीसारखा होता. त्यामुळे ही नवीन प्रजातअसल्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्यानंतर विवेक यांनी डॉ. दत्तप्रसाद सावंतयांच्याशी सल्लामसलत करून नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स,बंगळुरू येथील डॉ. कृष्णमेघ कुंटे यांच्या प्रयोगशाळेत पुढील तपास करण्याचेठरवले. डॉ. कुंटेंच्या साहाय्याने प्रयोगशाळेत नमुन्यांची आकारशास्त्राद्वारेतपासणी केल्यावर आणि सूक्ष्मदर्शकाखाली छायाचित्रे घेतल्यावर हा प्रजात संपूर्णजगात नवीन असल्याचे सिद्ध झाले.
कोकणचा कंकासुर
विवेक चंद्रनयांच्या नव्या प्रजातीमुळे डॉ. सावंत यांनीही त्यांच्याकडे असलेल्या सर्वमेरोगोम्फस प्रजातींचे फोटो पुन्हा अभ्यासले. यात त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलदेवगड तालुक्यातून छायाचित्रित केलेलं मेरोगोम्फस काहीसे वेगळे वाटले. या सर्वमेरोगोम्फस चतुरांच्या शरीरावरचे पिवळे पट्टे कमी असून बराचसा भाग काळा होता.मात्र मलबार कंकासुर (मेरोगोम्फस तमाराशेरीयन्सिस) या १९५३ साली शोधण्यात आलेल्याप्रजातीशी साधर्म्य असल्याने त्यांनी या सर्व मेरोगोम्फसना मलबार कंकासुर समजूनत्यांची नोंद केली होती. मात्र ऑगस्ट २०२४ मध्ये देवगड तालुक्यातील हडपिड गावातूनपकडलेल्या नमुन्यांचे निरीक्षण केल्यावर त्यांना ही प्रजात देखील नवीन असल्याचेलक्षात आले. डॉ. कुंटे यांच्या प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास केल्यावर यानवीन प्रजातीवर शिक्कामोर्तब झाले. या प्रजातीचा रंग बहुतांश काळा असून त्यावर इतरमेरोगोम्फसपेक्षा याच्या शरीरावर पिवळ्या पट्ट्यांचे प्रमाण फार कमी आहे. शिवायनराच्या शेपटीकडील उपांगांचा आकार हा एखाद्या बूमरँग सारखे जबडे असलेल्यापक्कडीसारखा आहे. चतुर आणि टाचण्या यांचे मराठीत बारसे झालेले नाही. त्यामुळे मेरोगोम्फस या कुळाला मराठीत आजपर्यंत नाव नव्हते. मात्र मेरोगोम्फस प्रजातींच्या नर चतुराला असलेल्या पक्कडीसारखा उपांगांमुळे त्यांना 'कंकासुर'हे नाव दिले गेले आहे. 'कङ्कमुखम्'या संस्कृत शब्दावरून हे नाव तयार केले आहे. याचा अर्थ पक्कडीसारखा जबडा असलेले हत्यार असा होतो.