वाल्मिक कराडशी संबंध असल्याचे आरोप माजी नगरसेवक दत्ता खाडेंनी फेटाळले

    21-Jan-2025
Total Views | 75

datta khade
 
बीड : (Beed Case) बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड प्रकरणात आता पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी करण्यात आली आहे.
 
वाल्मिक कराडच्या पुण्यातील मालमत्ता व्यवहारात खाडेंनी मध्यस्थी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता, याच प्रकरणी त्यांना बीडमधील केज येथे चौकशीकरिता बोलवले होते. या चौकशीत खाडेंनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी बोलताना दत्ता खाडे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
 
बीड जिल्ह्यातील केज येथे मला सीआयडीने चौकशीसाठी बोलवले होते. माझी चौकशी झाली, मी जी काही उत्तरे द्यायची आहेत, ती दिली आहेत. मी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. हा केवळ राजकीय स्टंट आहे. निवडणूका जवळ आल्या आहेत. प्रतिमा मलीन करायच्या उद्देशाने हे आरोप करण्यात आले आहेत. माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते, तेव्हा माझी वाल्मिक कराडशी तोंड ओळख आहे. त्याच्यासोबत माझा कोणत्याही प्रकरणात कसलाही संबंध नाही. मी सीआयडीला चौकशीदरम्यान पूर्णपणे सहकार्य केले आहे.

- दत्ता खाडे, माजी नगरसेवक, पुणे महापालिका
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121