आरोपी मोहम्मद शहजादला ५ दिवसांची पोलिस कोठडी

    19-Jan-2025
Total Views | 64
Saif Ali Khan

मुंबई : सैफ अली खान हल्ल्या प्रकरणी ( Attack on Saif ) आरोपी मोहम्मद शहजादला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीकडे बांगलादेशी कागदपत्रे सापडल्याने वांद्रे कोर्टाने अधिक तपासासाठी पोलिस कोठडी सुनावली. सैफवर हल्ला केल्यावर बांगलादेशला पळण्याच्या तयारीत असलेल्या मोहम्मद शहजादला २०० पोलिसांनी सापळा टाकून ठाण्याच्या कासार वडवली भागात पकडले.

आरोपी मोहम्मद शहजाद सहा महिन्यांपूर्वी मुंबईत आला. त्याचे विजय दास नावाने वास्तव्य केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तर दुसरीकडे आरोपी गेल्या सात वर्षांपासून मुंबईत राहत असल्याचा दावा मोहम्मद शहजादच्या वकिलांनी केला आहे. आरोपी बांगलादेशी असल्याने सैफवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट असू शकतो असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोपी हा हाऊसकिपिंग एजेंसीमध्ये काम करत होता. त्याला हे काम कसे मिळाले याचादेखील तपास करण्यात येणार. या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत सर्व स्पष्ट होणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121