सैफ अली खान हल्ल्याप्रकरणात दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

    18-Jan-2025
Total Views | 71
 
 Saif Ali Khan
 
भोपाळ: बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खानवरन (Saif Ali Khan) मुंबईतील वांद्रेमध्ये राहत्या घरात त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. ही घटना १६ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली होती. नुकतेच हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यानंतर आता हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
 
छत्तीसगड आणि मध्यप्रेशातून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. छत्तीसगडमधील दुर्गमधील रेल्वे संरक्षण दलाने एका संशयिताला ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रेल्वेमधून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केल्याने संबंधित आरोपीची ओळख पटली आहे.
 
संबंधित वृत्तानुसार, छत्तीसगडमधील आरपीएफने दुर्ग रेल्वे स्थानकावर संशयिताला पकडले आणि नंतर त्याला जीआरपी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची चौकशी केली गेली. तर दुसरीकडे, मध्य प्रदेशातील मुंबई पोलिसांनी स्थानिक अधिकाऱ्यांसह आणखी एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामुळे सैफ अली खानवरील झालेल्या हत्येचे गुढ लवकरच समोर येणार असल्याची माहिती आहे.
 
या प्रकरणादरम्यान, पोलिसांनी मुंबईतील दादरमधील एका मोबाईल शॉपमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवले होते. त्यावेळी एका संशयित व्यक्तीला इअरफोन खरेदी करताना पाहिले होते. याप्रकरणामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर संबंधित व्यक्ती हा रेल्वे स्टेशननजीक दिसला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी डोळ्यात तेल घालत पाळत ठेवली होती. याप्रकरणाची माहिती इतर राज्यांमध्ये प्रसारित करण्यात आली होती. त्यामुळे संशयिताचा चेहरा आरोपीशी मिळताजुळता असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हल्लोखोर हा कपडे बदलून जाणार असल्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो लाकडी दांडा आणि हेक्सॉ ब्लेड दिसत होते. यावेळी पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशी केली होती. त्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121