कराडच्या अडचणीत वाढ! संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेशी फोनवरून संवाद

    11-Jan-2025
Total Views | 199
 
beed
 
बीड : (Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी मस्साजोगला जातना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केल्याची माहिती समोर येत आहे.
 
सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात दोनवेळा संवाद
 
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेल्या सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात ६ डिसेंबर रोजी दोन वेळा फोनवर संवाद झाल्याचे समोर येत आहे. सुदर्शन घुलेने मस्साजोगच्या पवनचक्की प्लांटवर जाण्याआधी वाल्मिक कराडला फोन केला होता. यानंतर संतोष देशमुखांसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर पुन्हा एकदा सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांनी संवाद साधला होता. यानंतर ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती.
 
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ वाशिममध्ये मूक मोर्चा
 
दरम्यान बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ वाशिममध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने आज वाशिममध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिमच्या श्री शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढला जाणार आहे. या मूक मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित राहणार आहेत. वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख देखील मोर्चात सहभागी होणार आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121