हिजबुल्लाहचा म्होरक्या जागीच ठार

    25-Sep-2024
Total Views | 709
 
Hezbollah vs Israel
 
 बेरूत : हिजबुल्लाह विरूद्ध इस्त्रायल (Hezbollah vs Israel) युद्धात इस्त्रायलच्या मिसाईल मॅनला जागीच ठार करण्यात आले. हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर म्हणून इब्राहिम कुबैसीची ओळख आहे. आता इस्त्रायलने या मिसाईल मॅनला ईट का जवाब पत्थरसे दिला आहे. इस्त्रायलवर हवाई हल्ले करणारा इब्राहिम कुबैसी होता. मात्र आता त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती एका प्रसारमाध्यमाने दिली असून ही घटना मंगळवारी घडली होती.
 
इस्त्रायलच्या लष्कराने सांगितले की, इब्राहिम कुबैसी हा हिजबुल्लाहचा मिसाईल मॅन होता. त्याने याआधी इस्त्रायलवर अनेकदा हवाई हल्ले केले होते. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली नाही. मात्र काही वेळानंतर कुबैसीला ठार केल्याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी एनडीएफने सांगितले की, याआधी इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्यात इब्राहिम कुबैसी जबाबदार होता. त्याला मिसाईल क्षेत्रातील ज्ञान होते.
 
दरम्यान, २०२३ मध्ये इस्त्रायल आणि हमास युद्धाचा हिजबुल्लाह आणि इस्त्रायल यांच्या युद्धाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. या युद्धात इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या पेजरवर हल्ला केला. त्यानंतर सोलार पॅनल आणि वॉकी टॉकीवर हल्ला केला. त्यानंतर आता तर इस्त्रायलने मिसाईल मॅनवर हल्ला करत ठार केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

कुंडमळा पूल दुरुस्तीला हेतुपुरस्सर दिरंगाई  झाली असल्यास संबंधितांवर कारवाई! - रविंद्र चव्हाण; संजय राऊतांची टीका निव्वळ राजकारणापोटी

मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद असून मृतांच्या कुटुंबासोबत व जखमी झालेल्यांमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. मात्र अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने केलेली टीका ही अत्यंत उथळ, अपरिपक्व विचारांचे प्रदर्शन करणारी आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी केली. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121