केंद्रीय मंत्री पीयूष गोयल बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी
18-Sep-2024
Total Views | 37
मुंबई : (Piyush Goyal) लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवार, दि. १८ सप्टेंबर रोजी उत्तर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेशभक्तांचा उत्साह वाढवला.
उत्तर मुंबईतील विसर्जन स्थळांना पीयूष गोयल यांनी भेट दिली. मालाड भुजाळे तलाव येथून सुरुवात करीत चारकोप, मागाठाणे, कांदिवली पूर्व, बोरिवली ते थेट दहिसरपर्यंत प्रत्येक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत ते सहभागी झाले. गणेश भक्तांना अल्पोपहार देऊन गोयल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार योगेश सागर, अतुल भातखळकर, सुनील राणे, प्रकाश सुर्वे, मनिषा चौधरी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, माजी नगरसेवक विनोद शेलार, सुनील कोळी, युवामोर्चा अध्यक्ष अमर शाह आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.