गणेश भक्तांनो, विसर्जनादरम्यान ‘मत्स्यदंश’पासून राहा सावधान!

    10-Sep-2024
Total Views | 59
BMC Guidelines For Ganesh Immersion

मुंबई :
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेश विसर्जनादरम्यान मुंबईतील समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना मत्स्यदंश करू शकणारे अपायकारक मासे हे मत्स्य विभागाने केलेल्या 'ट्रायल नेटिंग' मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (महाराष्ट्र शासन) यांच्याकडून कळविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटी येथे गणेश भक्तांना मत्स्यदंश करणाऱ्या माशांचे अस्तित्व आहे काय ? यासाठीची चाचपणी (ट्रायल नेटिंग) नुकतीच केली. यादरम्यान ढोमी, कोळंबी, स्टिंग रे (पाकट), जेली फीश, शिंगटी, ब्लू जेली फीश, घोडा मासा, छोटे रावस आदी मासे आढळून आहेत. नेटींग दरम्यान पाकट (स्टिंग रे) हे मासे आढळून आले आहेत. त्यासोबतच माशांसोबतच जेली फीश, ब्लू जेली फीश हे अपायकारक मासे आढळून आले आहेत.

दरम्यान श्रीगणेशोत्सव अंतर्गत स्वराज्य भूमी (गिरगांव चौपाटी) येथे महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत भाविकांसाठी विविध नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्वराज्यभूमीला भेट देवून संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली व योग्य ते निर्देश दिले. सहायक आयुक्त शरद उघडे, संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करताना खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी

१. श्रीगणेश मूर्ती विसर्जन हे महापालिकेने नेमणूक केलेल्या जीवरक्षक व संबंधित यंत्रणेमार्फत करावे.

२. विसर्जनादरम्यान गणेशभक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करणे टाळावे.

३. गणेश विसर्जनादरम्यान पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.


४. मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस दल यांच्याद्वारे विसर्जन ठिकाणी वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

५. विसर्जन ठिकाणी आवश्यक तेथे महापालिकेद्वारे प्रथमोपचार करण्यासाठी वैद्यकीय कक्ष असणार आहेत. मत्स्यदंशाची घटना घडल्यास संबंधितांनी तात्काळ प्रथमोपचारासाठी या वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा.
.

अग्रलेख
जरुर वाचा
मणिपूर पुन्हा पेटलं! आंदोलकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न, जमावबंदी लागू; पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

मणिपूर पुन्हा पेटलं! आंदोलकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न, जमावबंदी लागू; पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

(Manipur Tense Over the Arrest of Arambai Tenggol Leader) मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मणिपूर सातत्याने धुमसत आहे. येथील तणाव निवळण्याची चिन्हं दिसत नाही. राज्यातून हिंसाचाराच्या बातम्या वेळोवेळी येत राहतात. आता मैतेई समुदायाच्या एका प्रमुख नेत्याच्या अटकेनंतर मणिपूरमध्ये हिंसाचाराची लाट उसळली आहे. यामुळे इंफाळसह पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. तर विष्णुपुर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ..

लॉस एंजेलिस पेटले! ट्रम्पच्या

लॉस एंजेलिस पेटले! ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे आंदोलन चिघळले; ४४ जण ताब्यात

अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे स्थलांतरित समुदाय आणि यूएस इमिग्रेशन व कस्टम्स एन्फोर्समेंट यांच्यातील संघर्ष हिंसक वळणावर गेल्याचे निदर्शनास येते आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेले निदर्शन हाताळणे कठीण होत चालल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी निदर्शकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचवेळी, निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक आणि फटाके फेकले. संपूर्ण परिसरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्तपणे नॅशनल गार्ड तैनात केल्यानंतर निदर्शनांना हिंसक वळण आल्याचे समोर येते आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121