नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स नागपूरच्या सदस्यपदी खासदार डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एम्स सदस्य निवडणुकीचा निकाल लागला असून जुलै 2024 रोजी संसद सभागृहात मंजूर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यसभेचे पाच सदस्य निवडून आले आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातीलराज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांची सदस्यपदी निवड झाली आहे.