१५ ऑगस्टला श्रद्धा कपूर, अक्षय कुमार येणार आमने-सामने; एकूण ४ चित्रपटांची होणार टक्कर

    30-Jul-2024
Total Views | 46

stree 2 
 
 
मुंबई : ओटीटी वाहिनीवर प्रेक्षकांसांठी मनोरंजनाची मेजवानी तर आहेच पण चित्रपटगृहातही अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी ४ चित्रपट चक्क एकाच दिवशी प्रदर्शित होणार असून काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. १५ ऑगस्ट रोजी बहुचर्चित आणि प्रतिक्षित स्त्री २ प्रदर्शित होणार असून याच दिवशी अक्षय कुमारचा खेल खेल में हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. पण आता या २ चित्रपटांसोबत आणखी २ चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे एकाचदिवशी प्रेक्षकांचा प्रचंड गोंधळ उडणार यात शंका नाही.
 
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'स्त्री' चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ती प्रतिक्षा संपली असून १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्त्री २ प्रदर्शित होणार आहे.
 
अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी 'वेद' ‘ स्त्री २’ ला टक्कर देणार आहेत. याही चित्रपटात जॉन अब्राहम पुन्हा एकदा ॲक्शन करताना दिसणार आहे. दरम्यान, १५ ऑगस्टलाच प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात जॉनसोबत ‘मुंज्या’ फेम अभिनेत्री शर्वरी वाघ झळकणार आहे.
 
सरफिरा चित्रपटानंतर लगेचच अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात फरदीन खान, तापसी पन्नू, वाणी कपूर, ॲमी विर्क, प्रज्ञा जैस्वाल आणि आदित्य सील हे कलाकार दिसणार आहेत.
 
दिग्दर्शक हरीश शंकर यांचा 'मिस्टर बच्चन' चित्रपट १५ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार असून अजय देवगणची प्रमुख भूमिका असणाऱ्य़ा 'रेड'चा अधिकृत रिमेक आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121