ग्रांट रोडला इमारत कोसळली

एकाच मृत्यू, एक जण जखमी

    20-Jul-2024
Total Views | 81
Bulding colaps
 
मुंबई : मुंबईतील ग्रँड रोड परिसरात रुबिनिसा मंझील नावाच्या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळण्याची घटना घडली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. हे चारही जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. जवानांकडून तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले.
 
लोकांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढले.  चार मजली रुबिनिसा मंझील इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीसह काही भाग शनिवार, दि.२० रोजी सकाळी कोसळला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी इमारतीत सुमारे ३५-४० लोक होते. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
 
इमारत धोकादायक स्थितीत
दरम्यान, इमारतीचा पुढचा काही भाग या घटनेनंतर अंधातरी अवस्थेत लटकत आहे. यामुळे तो कधीही कोसळू शकतो. अग्निशमन दलासह पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाली. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहे. मात्र या पावसाळ्यातील ही पहिलीच मोठी दुर्घटना आहे.
 
मुंबईत मुसळधार सरी
 
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईला यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार, संपूर्ण मुंबईत दिवसभर पाऊस सक्रिय झाला. याचाच परिणाम मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सब-वे तसेच कुर्ला स्थानक परिसरात पाणी साचले आहे. मुंबईसह उपनगर, कल्याण-डोबिंवली तसेच नवी मुंबई, ठाणे परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.
 
लोकल १० ते १५ मनिटे उशिराने
पावसाचा परिणाम मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेवर झाल्याचा दिसून येत आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन्स १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल ५ ते १० मिनिटे विलंबाने सुरू आहेत. त्याचबरोबर हार्बर लाईनवरील लोकल देखील १५ ते २० मिनिटे उशिरा सुरू आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात ५ आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत!

महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात ५ आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत!

जागतिक संगीत दिनानिमित्त उद्या दि. २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव अंतर्गत आशा रेडिओ पुरस्कार २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ५ नामांकित आर जे देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. नरिमन पाँईट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी २ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121