विशाळगड प्रकरणी छत्रपती संभाजी राजांना भारतीय मराठा महासंघाचा पाठींबा

छत्रपती संभाजी राजांची भेट घेऊन देणार निवेदन

    19-Jul-2024
Total Views | 65
मराठा
ठाणे : विशाळगड अतिक्रमणा विरोधात उभे ठाकलेल्या छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघाने समर्थन दिले असुन विशाळगड आंदोलनाला जाहिर पाठींबा व्यक्त केला आहे. तसेच, येत्या आठ दिवसात छत्रपती संभाजी राजांची भेट घेऊन महासंघाच्यावतीने निवेदन सुपूर्द करणार आहोत. अशी माहिती भारतीय मराठा महासंघाचे नूतन अध्यक्ष महेश कदम यांनी दिली. भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महेश कदम यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
 
यावेळी बोलताना कदम यांनी, मराठा आरक्षण ते विशाळगड आंदोलन आदी विषयांवर परखड मत मांडले. मराठा समाजाच्या नावाने सध्या बरेच राजकारण सुरू आहे, स्व. यशवंतराव चव्हाण ते आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे ९० टक्के मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत. ह्या राज्यकर्त्याकडुन मराठा समाजाला अपेक्षा आहेत. मराठा आरक्षणासाठी लढणारे योद्धे मनोज जरांगे यांची भूमिका योग्यच आहे, पण त्यांनीही संयमाने घेणे गरजेचे आहे. मराठा आणि ओबीसी वाद होऊ नयेत ही महासंघाची भूमिका आहे. मात्र, कुणी आपली पोळी भाजून घेत असेल तर त्याला मराठा महासंघाचे समर्थन नसेल.
 
तसेच विशाळगडवर जो काही अनुचित प्रकार झाला तो, समाजकंटकांनी केल्याचा दावा करून महेश कदम यांनी, विशाळगडच्या अतिक्रमणा विरोधात छत्रपती संभाजी राजे यांनी जी भूमिका घेतली, त्याला मराठा महासंघाचा जाहीर पाठींबा असुन येत्या आठ दिवसात छत्रपतींना भेटून यासंदर्भातील निवेदन देणार आहोत. त्याचबरोबर, विशाळगड प्रकरणी जे काही गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्यासाठी शासनाला विनंती असो अथवा जे काही प्रयत्न असतील ते करणार असल्याचे महेश कदम यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावंड म्हणाले, भारतीय मराठा महासंघ मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मराठा आरक्षण मिळालेच पाहीजे, मात्र, सध्या जी काही राजकिय चिखलफेक सुरू आहे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे घोंगडे भिजत ठेवून जे राजकारण केले जात आहे, त्याला महासंघाचे कधीही समर्थन नसल्याचे नमुद केले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121