लव्ह जिहाद! राजकुमार बनलेल्या शाबीरने केला महिलेवर अत्याचार; धर्मांतरण न केल्यास जीवे मारण्याची धमकी
21-Jun-2024
Total Views | 43
भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. येथे तरुणाने आपली खरी ओळख लपवून एका महिलेचे ११ वर्षे शारीरिक शोषण केले. तो स्वत:ला हिंदू म्हणवून घेत होता. त्याचे रहस्य उघड झाल्यावर त्याने महिलेवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबावही टाकला. तसे न केल्यास महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्वाल्हेर शहरातील गोला पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने शाबीर उर्फ शराफत अलीविरुद्ध लव्ह जिहादचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेने सांगितले की, ती जवळपास एक दशकापासून पतीपासून वेगळी राहत आहे. याचदरम्यान तिची शबीरशी ओळख झाली.
शाबीरने महिलेला आपले नाव राजू उर्फ राजकुमार असल्याचे सांगितले होते. शबीर हा मध्य प्रदेशातील भिंडचा रहिवासी आहे. शाबीरने महिलेला फसवून तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले आणि तिचे शारीरिक शोषण केले. महिलेने शाबीरसोबत लग्नाबाबत बोलले असता सत्य बाहेर आले. स्वत:ला राजू म्हणवून घेणारा तरुण शाबीर असल्याचे महिलेला समजले. महिलेला सत्य समजल्यानंतर तिने याबाबत शबीरला विचारणा केली.
यानंतर तो महिलेला धमकावू लागला. शाबीरने महिलेला धमकी दिली की, जर तिने इस्लाम स्वीकारला नाही तर तो तिला आणि तिच्या १३ वर्षाच्या मुलाला ठार मारीन. यानंतर पीडितेने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. तपासानंतर पोलिसांनी आरोपी शाबीरला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.