अरविंद केजरीवाल उद्या येणार तुरुंगाबाहेर; न्यायालयाकडून जामीन मंजूर!

    20-Jun-2024
Total Views | 44
Arvind Kejriwal
 
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्लीच्या राऊस व्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर दिला आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पुन्हा तुरूंगात जावे लागले होते. जामिनाला विरोध करण्यासाठी ईडीने 48 तासांचा वेळ मागितला आहे. शुक्रवारी कर्तव्य न्यायाधीशांसमोर हे युक्तिवाद करता येतील, असे न्यायालयाने सांगितले.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुरुंगाबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक संपताच त्यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्याला नियमित जामीन मिळाला आहे. विशेष न्यायाधीश बिंदू यांनी ईडीची सुनावणी घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. बचाव पक्षाने दावा केला होता की, आप नेत्याला दोषी ठरवण्यासाठी फिर्यादीकडे कोणतेही पुरावे नाहीत. युक्तिवादादरम्यान, ईडीने न्यायालयाला सांगितले की 7 नोव्हेंबर 2021 रोजी केजरीवाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोव्यातील हॉटेल ग्रँड हयात येथे थांबले होते आणि बिल चनप्रीत सिंग यांनी दिले होते, ज्यांच्यावर किनारी प्रदेशात ‘आप’ला मदत केल्याचा आरोप आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121