काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला मोठे यश; हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी अडकला जाळ्यात
17-Jun-2024
Total Views | 108
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा नंतर आता हंदवाडा येथे दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. उत्तर काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला पकडले आहे. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने सोमवार, दि. १७ जून २०२४ हंदवाडा येथील कचारी गावातून हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला पकडल्याची माहिती दिली.
झाकीर हमीद मीर असे या दहशतवाद्याचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा दल आणि पोलिसांनी झाकीर हमीद मीर नावाच्या सशस्त्र दहशतवाद्याला अटक केली आहे. तो हंदवाडा येथील कचारी गावचा रहिवासी आहे. हंदवारा एसएसपी दाऊद अय्युब यांनी सांगितले की, तो एका पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होता.
दुसरीकडे बांदीपोरा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात रविवारी रात्री उशिरा चकमक झाली. या गोळीबारात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. घेराबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अरगाममध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने संशयित जागेकडे शोध मोहीम तीव्र केल्याने लपलेल्या दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली.