डिजिटल जाहिरात फलक रात्री ११ नंतर बंद; पालिकेकडून नियमावली जाहिर!

    13-Jun-2024
Total Views | 35
Digital Advertisement Board news

मुंबई :
डिजिटल जाहिरात फलक रात्री ११ नंतर सुरु राहिल्यास संबधित जाहिरात संस्थेच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश पालिकेने दिलेले आहेत. अतिप्रखर प्रकाशमान डिजिटल जाहिरात फलकामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास होतो. त्यासंदर्भात काही तक्रारी पालिककडे आल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. दरम्यान रात्री ११ नंतर जाहिरात फलक सुरु राहिल्यास जाहिरात संस्थेची लाखोची अनामत रक्कम जप्त केली जाईल, असे ही सांगण्यात आलेले आहे.
 
मुंबईत सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत जाहिरात फलक डिजिटल करण्यास सुरुवात झाली. मुंबईत एकूण १०२७ जाहिरात फलक आहेत. त्यात ६७ जाहिरात फलक हे डिजिटल स्वरुपात आहेत. या जाहिरात फलकावर चित्रफिती असतात तसेच सतत बदलणारी चित्रे ही या डिजिटल फलकांवर पाहायला मिळतात. डिजिटल जाहिरात फलक लावण्याचे धोरण पालिकेने दोन वर्षाआधी स्विकारले होते. मात्र या डिजिटल जाहिरत फलकांचा वाहनचालकांना त्रास होत असल्याने तक्रारी येऊ लागल्या आहेत. कारण सतत बदलणाऱ्या चित्रांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. तसेच जाहिरात फलकाजवळ राहणाऱ्या रहिवाश्यांना ही त्याचा त्रास होतो. ज्यामुळे रात्री ११ नंतर डिजिटल जाहिरात फलक बंद करण्याचे धोरण पालिकेने जाहिर केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121