सीबीएसई बोर्डाच्या शाळेत शिक्षक उपलब्ध करू द्यावे या मागणीसाठी पालिका मुख्यालयासमोर उपोषण इशारा
13-Jun-2024
Total Views | 24
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळाच्या सीबीएसई बोर्डाची शाळा क्रमांक- ९८ सारसोळे येथे अपुरे शिक्षण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तत्काळ शिक्षक उपलब्ध करू द्यावे या मागणीसाठी माजी नगरसेवक तथा भाजप जिल्हा महामंत्री सुरज पाटील ये येत्या १५ जुन पासून पालिका मुख्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने सीबीएसई बोर्डाचे नर्सरी वर्ग चालविले जातात.
आकांक्षा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शाळेचे व्यवस्थापन केले जाते सारसोळे येथिल शाळा क्रमांक ९८ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता शिक्षक संख्या कमी आहे. त्यामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसेच विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य सुद्धा अपुरे असल्याने , पुरेसे उपलब्ध करु द्यावे अशी विनंती शिक्षण मंडळाला करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आपण १५ जुन रोजी पालिकेच्या मुख्यालय समोर उपोषणाला बसणार असल्याचे सुरज पाटील यांनी सांगितले.