मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सनातन धर्माविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या प्रियांका पॉल (Anti Hindu Priyanka) या वामपंथी महिलेचे सोशम मीडिया अकाऊंट चर्चेत आले आहे. प्रियांका पॉल तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अनेक दिवसांपासून हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या मजकुराचा प्रचार करत असल्याचे दिसत आहे. प्रकरण बाहेर आल्यानंतर प्रियांका पॉल यांच्या अटकेची मागणी होत आहे. लोकांनी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रियांका पॉलने आपल्या हिंदुत्वविरोधी पोस्टमध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्यामुळे हिंदू संघटना त्यांच्यावर नाराज आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रभू श्री रामाला थप्पड मारताना दाखवले आहेत. याशिवाय प्रियंका पॉलने एक फोटो शेअर केला होता ज्यात तिच्या हातावर टॅटू आहे. या टॅटूमध्ये भगवान राम झाडाला बांधलेले दाखवले असून भीमराव आंबेडकरांच्या हातात काठी दाखवण्यात आली आहे. तिचे ७४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हा आयडी आधी सार्वजनिक होता, मात्र हिंदूंनी आवाज उठवल्यानंतर प्रियांकाने आपली गैरकृत्ये लपवण्यासाठी हा आयडी खासगी केल्याचे दिसत आहे.