वांद्रेचा स्कायवॉक पडण्यात येणार

अर्धवट स्कायवॉकमुळे स्थानकाच्या सौंदर्यात अढथळा

    25-May-2024
Total Views | 22

bandra
 
मुंबई, दि.२४ : एसव्ही रोडवरील वांद्रे रेल्वे स्टेशन ते लकी जंक्शन पर्यंत स्कायवॉक पाडण्याचे काम पुन्हा सुरू होणार आहे. मेट्रो लाईन २ब (डी एन नगर ते मंडाले)पर्यंत जाण्यासाठी सात महिन्यांपूर्वी स्कायवॉकचा एक मोठा भाग पाडण्यात आला होता. स्कायवॉकच्या बाजूचे संरक्षक कवच काढण्यात आले असले, तरी त्याच्या आजूबाजूचे खांब, पदपथ आणि धातूचे रॉड शिल्लक राहिले आहेत. अशातच वांद्रे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या स्थानकांच्या सौंदर्यात वाढ झाली असून ते आता मूळरूपात परत आले आहे.
वांद्रे स्थनाकावरील वाहतूक सुरळीत करण्याचे कामही करण्यात आले आहे. अशावेळी स्कायवॉकचे फक्त दृश्य उरले असून, त्यातील खांब जमिनीवर पादचाऱ्यांच्या हालचालींना अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हा स्कायवॉक काढण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हा स्कायवॉक बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे (बीएमसी) हस्तांतरित करण्यात आला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121