बारावीचा निकाल जाहीर! कोकण विभागाने मारली बाजी

    21-May-2024
Total Views | 119
 
12th result
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा (12th Result) निकाल जाहीर झाला असून राज्यात ९३.३७ टक्के इतका निकाल लागला आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता आपला निकाल बघता येणार आहे.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत यावेळी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत राज्यभर परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये विज्ञान, कला, वाणिज्य व्यावसायिक अभ्यासक्रम आणि आयटीआय या शाखांसाठी १४ लाख ३३ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती. यापैकी १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेत प्रविष्ट झाले असून १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी बारावाची निकाल ९३.३७ टक्के लागला आहे.
 
मागील वर्षीचा बारावीचा निकाल हा ९१.२५ टक्के होता तर यावर्षी तो ९३.३७ टक्के इतका आहे. म्हणजेच यावर्षीच्या निकालात २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील ९ विभागातील निकालाची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
 
कोकण - ९७.५१ टक्के
नाशिक - ९४.७१ टक्के
पुणे - ९४.४४ टक्के
कोल्हापूर - ९४.२४ टक्के
छत्रपती संभाजीनगर - ९४.०४
अमरावती - ९३ टक्के
लातूर - ९२.३६ टक्के
नागपूर - ९२.१२ टक्के
मुंबई - ९१.९५ टक्के
 
दुपारी १ वाजता विद्यार्थी पुढील अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल बघू शकतात.
 
1. mahresult.nic.in
2. http://hscresult.mkcl.org
3. www.mahahsscboard.in
4. https://results.digilocker.gov.in
5. http://results.targetpublications.org
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121