महावितरणचे‘ऊर्जा' चॅट बॉट २४ तास उपलब्ध

वीजग्राहकांनां माहितीसह तक्रार नोंदविण्यासाठी मदत

    10-May-2024
Total Views | 55

mseb chatbot


मुंबई, दि.९ : प्रतिनिधी 
महावितरणने राज्यातील ३ कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहे तसेच नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे.

महावितरणच्या वीजसेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. ग्राहकसेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा’ नावाचे चॅट बॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केले आहे. नवीन वीजजोडणी वा त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा, मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी इतर विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीजवापर व बिलाचे कॅलक्यूलेटर आदींबाबत वीजग्राहकांना ‘ऊर्जा’ चॅट बॉट थेट मदत करीत आहे. यासोबतच वीजपुरवठा खंडित होणे तसेच वीजबिलांसह इतर तक्रारींबाबत संपूर्ण माहिती वीजग्राहकांना उपलब्ध होत आहे. यामध्ये तक्रार करण्यासाठी महावितरणचे २४x७ सुरू असलेले टोल फ्री क्रमांक, ‘एसएमएस’ क्रमांक, ई-मेल, मिस्ड कॉल सेवा आदींची माहिती चॅटबॉट द्वारे उपलब्ध आहे.

मार्च महिन्यापासून कार्यान्वित झालेल्या ‘ऊर्जा’ चॅट बॉटचा वीजग्राहक मोठ्या संख्येने वापर करीत असून त्यांना वीजसेवा किंवा तक्रारी नोंदविण्याबाबत माहिती घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाण्याची आता आवश्यकता उरलेली नाही. मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक सबमीट करून विविध सेवा घेण्यासाठी चॅट बॉटद्वारे महावितरणशी संवाद साधता येईल. तसेच इतर ग्राहकांना विविध सेवेचा लाभ घेता येत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121