गडकरींसमोर उभं राहणाऱ्यांचं डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे : सुनील शेट्टी

    15-Apr-2024
Total Views | 104
 
Sunil Shetty
 
मुंबई : गडकरींसमोर उभं रहाणाऱ्यांचं डिपॉझिट जप्त व्हायला हवं आणि तुम्ही ५ नाही तर १० लाख मतांनी निवडून यावं, अशा शुभेच्छा अभिनेते सुनील शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिल्या आहेत. राज्यात लोकसभा निवडणूकांची तयारी सुरु असून नितीन गडकरींना नागपूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, सुनील शेट्टींनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
सुनील शेट्टी म्हणाले की, "गडकरीजी तुम्ही या देशाचा नकाशा बदलून टाकलेला आहे. तुमच्या कामामुळे तुम्हाला लोकांचे आशीर्वाद मिळाले आहेत. एक लाख किलोमीटचे राष्ट्रीय महामार्ग आणि ग्रामीण विभागाच्या दृष्टीनेही तुम्ही हा प्रयत्न केला की, प्रत्येक गरीब व्यक्तीला आपल्या घरापर्यंत वाहतूक मिळावी. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही जिंकावं अशी माझी ईच्छा आहे."
 
हे वाचलंत का? -  विश्वप्रवक्ते चार टर्म खासदार! मराठी माणसासाठी काय केलं?
 
"माझ्या मते तर तुमच्या पुढे उभं असलेल्यांचं डिपॉझिट जप्त व्हावं. त्यामुळे तुम्ही ५ लाख काय १० लाख मतांनी जिकांवं असं मला वाटतं. तुम्ही अविश्वसनीय आणि जबरदस्त काम केलेलं आहे. तुम्हाला फ्लायओव्हर मॅन आणि हायवे मॅन कुणी असंच म्हणत नाही. आज भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांबद्दल बोलायचं झाल्यास ते फक्त आणि फक्त या काळात झालेले आहे. वाजपेयीजींपासून तर मोदीजी आणि तुम्ही सर्वांनी मिळून खूप चांगलं काम केलेलं आहे," असे ते म्हणाले.
 
 
ते पुढे म्हणाले की, "मी कुठेही गेलो आणि मला एखादं विलक्षण काम किंवा हायवे दिसला तर मी कायमच तुमचं अभिनंदन करण्यासाठी तुम्हाला फोन केला आहे. तुम्ही तुमच्या टीमला सोबत घेऊन चालत असता. "नेकी कर और दर्या में डाल" म्हणजेच कुणाला काहीतरी द्या आणि ते विसरून जा, असं काम तुम्ही देशासाठी केलं आहे," असे म्हणत सुनील शेट्टींनी गडकरींना भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121