विश्वप्रवक्ते चार टर्म खासदार! मराठी माणसासाठी काय केलं?
15-Apr-2024
Total Views |
मुंबई : विश्वप्रवक्ते चार टर्म खासदार आहेत पण मराठी माणसासाठी काय केलं? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांना केला आहे. शीतल म्हात्रे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत संजय राऊतांवर निशाणा साधला.
विश्वप्रवक्ते... ४ टर्म खासदार...!!! काय केलं मराठी माणसासाठी...? समाजासाठी...? तुमच्या खासदार निधीने किंवा स्वताच्या पैशांनी कधी कोणत्या रुग्ण किंवा गरजूला मदत केली का? पत्राचाळीतल्या ६७२ बेघर कुटुंबाचा हिशोब कधी देणार ? खिचडी घोटाळ्यातला मलिदा खाल्लात त्याचा हिशोब कधी देणार?…
शीतल म्हात्रे म्हणाल्या की, "विश्वप्रवक्ते ४ चार टर्म खासदार असताना मराठी माणसासाठी आणि समाजासाठी काय केलं? तुमच्या खासदार निधीने किंवा स्वत:च्या पैशांनी कधी कोणत्या रुग्ण किंवा गरजूला मदत केली का?" असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच संजय राऊतांशी संबंधित घोटाळ्यांबाबतही म्हात्रेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "पत्राचाळीतल्या ६७२ बेघर कुटुंबाचा हिशोब कधी देणार? खिचडी घोटाळ्यातला मलिदा खाल्लात त्याचा हिशोब कधी देणार? मुलींना वाईन कंपनीच्या संचालक मंडळावर कोणी ठेवलं? त्यातील घोटाळ्यांबद्दल कधी बोलणार? कोविड घोटाळ्यात मृतांच्या टाळूवरचं लोणी कुणी खाल्लं? तुम्ही अजून निर्दोष नसून आरोपी आहात हे तुम्ही विसरला आहात का? जमलं कधी तर हे सगळे हिशोब द्या," असेही त्या म्हणाल्या.