सलमानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट! लॉरेन्स बिश्नोईची चौकशी होणार

    15-Apr-2024
Total Views |

Salman Khan 
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोईची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
रविवारी पहाटे सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील घरावर तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, यावेळी आरोपीने रायगडमधून जुनी दुचाकी खरेदी केली असून या दुचाकीची विक्री करणाऱ्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसचा तिढा सुटता सुटेना! नागपूरात तातडीची बैठक
 
गोळीबार करणारा आरोपी गँगस्टर लॉरेन्स विश्नोईचा जवळचा सहकारी रोहित गोदारासाठी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल उर्फ ​​कालू असे आरोपीचे आहे. दुसरीकडे, लॉरेन्स विश्नोईचा भाऊ अनमोल याने सोशल मीडियावर पोस्ट करत हा सलमान खानसाठी 'पहिला आणि शेवटचा इशारा' असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी आता लॉरेन्स बिश्नोईचीही चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.