इम्रान हाश्मी पहिल्यांदाच दिसणार स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेत!

    12-Mar-2024
Total Views | 34
अभिनेता इम्रान हाश्मी ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात पहिल्यांदाच स्वातंत्र्य सेनानीची भूमिका साकारणार आहे.
 
 
emran
 
मुंबई : देशावर आधारित अनेक चित्रपट सध्या भेटीला येत आहेत. अशात दिग्दर्शक कन्नन अय्यर एका वास्तववादी घटनेवर आधारित ‘ए वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan) चित्रपट घेऊन येत आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटात (Ae Watan Mere Watan) अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) पहिल्यांदाच स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत (Emraan Hashmi) अभिनेत्री सारा अली खान देखील दिसणार आहे.
 
इम्रान हाश्मीचा तो लूक व्हायरल.
 
बहुचर्चित ‘ए वतन मेरे वतन’ नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, यात इम्रान हाश्मी साकारत असलेल्या राम मनोहर लोहिया यांच्या भूमिकेमुळे तो सध्या सगळ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत पहिल्यांच इम्रान एका राजकीय व्यक्तिरेखेत दिसणार आहे. याबद्दल बोलताना इम्रान म्हणाला, “मला स्वातंत्र्य सेनानी राम मनोहर लोहिया यांची भूमिका मिळाली ही सन्मानाची बाब आहे, आणि या चित्रपटाचा भाग होता येणं ही आनंदाची गोष्ट आहे”.
 
दरम्यान, ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात सारा अली खान, इम्रान हाश्मी, सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, अॅलेक्स ओनील, आनंद तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महत्वाची बाब म्हणजे हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर Amazon Prime या ओटीटी वाहिनीवर २१ मार्च रोजी २०२४ प्रदर्शित होणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121