मुंबई: घाऊक बाजारातील व्यवसायिक गॅस व जेट फ्युएल किंमतीत वाढ झाली आहे. ऐनवेळी ही भाववाढ झाली असली तरी त्याची नेमकी कारणे अजून स्पष्ट झाली नाहीत. महानगरातील १९ किलो गॅसची किंमत २५ रूपयांने दरवाढ झाली आहे. १९ किलोच्या व्यवसायिक एलपीजी गॅसची घाऊक किंमत दिल्लीत १७९५ प्रति गॅस सिलेंडर होऊन मुंबईसारख्या ठिकाणी ही किंमत १७४९ रूपये प्रति सिलेंडर कलकत्ता व चेन्नई यैथे अनुक्रमे १९११ व १९६०.५० रूपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.
गॅस वाढीमागील कारण -
१) एटीएफ (एव्हिएशन टबाईन फ्युएल) किंमतीत वाढ झाल्याने गॅसच्या किंमती वाढल्याचे सांगण्यात आले आहे. नवे दर १ मार्च २०२४ पासून लागू असणार आहेत. कलकत्ता व दिल्लीतील घरगुती एअरलाईन्ससाठी हा खर्च वाढल्याने परिणामी विमानप्रवास महाग होणार आहे. घरगुती विमानतळावरील दिल्ली व कलकत्ता मध्ये खर्चाचे दर सुमारे १०१३९७ किलो वाढल्याने हे नवे दर आकारले जातील.
एटीएफची किंमत देशांतर्गत एअरलाईन्ससाठी आंतरराष्ट्रीय धावपट्टीवर दर ९४८०९ व १०५३९९ रूपये अनुक्रमे मुंबई व चेन्नईत आकारले जातील. याआधी फेब्रुवारी १ ला एटीएफमधील किंमतीत सरकारने घट केली होती. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला आंतरराष्ट्रीय किंमत व एटीएफमधील किंमतीतील बदलानुसार गॅस कंपन्या आपली दर आकारणी केली जाते.