शेअर बाजार: कालच्या अखेरची आज पुनरावृत्ती सकाळच्या सत्रात घसरण सुरू
अंतराळ क्षेत्रातील समभाग ७ टक्क्याने वाढले. सेन्सेक्समध्ये ४०० अंशाने घसरण निफ्टीत १२३ अंकाने घसरण
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज मोठा चढ उतार होताना दिसल. कालच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टीत घट पहायला मिळाली होती. सहा दिवसांच्या रॅलीनंतर मार्केट थंडावले होते. परंतु आज अनपेक्षितपणे मार्केट कालची ' री' ओढत पुन्हा ' बियर ' झाले आहे. सकाळच्या सत्रात सुरूवातीला निफ्टी ५० २६.५० (०.१२%) ने वाढत २२०८१.५५ पातळीवर पोहोचला होता. सेन्सेक्स ५३.४१ (०.०७%) वाढत ७२६७७.५० पातळीवर पोहोचला होता. मात्र १०.५५ ला सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात मोठी घट पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स मध्ये सुमारे ४०० अंशाने घसरण पहायला मिळाली असुन निफ्टीत १२३ अंशानै घसरण पहावयास मिळत आहे.
बँक निफ्टी व मिडकॅपमध्येही घट झाली असून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य घसरत भारतीय रुपया ८२.९३ पर्यंत पोहोचला आहे. युएस फेडरल बँकेच्या व्याजदरात ठोस निर्णय झाल्याचे बाजारात परिवर्तित झाले आहे. निफ्टी ५० सकाळी ११.०२ वाजता १५४.८५ अंशाने घसरत २१९००.२० पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांक ४८४.६५ अंशाने घसरत ४६५३५.०५ पातळीवर पोहोचला आहे.
निफ्टीवर एचसीएलटेक, आयशर मोटर्स, हिंदाल्को, आयटीसी ,टएकएम या समभागात तेजी पहायला मिळाली असून बीपीसीएल, ग्रासिम, भारती एअरटेल, टायटन, पॉवर ग्रीड या समभागात घसरण पहायला मिळत आहे. निफ्टीत ३७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली शिवाय १२ कंपनीच्या शेअर्स वधारले आहेत. सकाळच्या सत्रात निफ्टीने सर्वाधिक निर्देशांक पातळी २२०९४.३० पर्यंत गाठली आहे. निफ्टी स्मॉलकॅप ५० व स्मॉलकॅप १०० या निर्देशांकात मात्र तेजी पहायला मिळाली आहे.
आज निफ्टी निर्देशांकात मेटल, आयटी, मिडिया कंपन्यांचे समभाग तेजीत असून सर्वाधिक नुकसान फायनान्स सर्विसेस, बँक ऑटो समभागात झाले आहे. बीएसी सेन्सेक्सवरील एचसीएलटेक, एक्सिस बँक, आयटीसी, टीसीएस, विप्रो या समभागाचे मूल्य वधारलै आहे. व एशियन पेटंस, पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, टायटन या समभागात घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्स निर्देशांकाने सर्वाधिक मजल ७२७२४.५३ पातळीवर मारली आहे.
विशेषतः स्पेस समभागात थेट ७ टक्क्याने वाढ झाली आहे. भारताने अंतराळ क्षेत्रातील १०० टक्के विदेशी गुंतवणूकाला मान्यता दिल्यामुळे त्याचा मोठा फायदा स्टॉक मार्केटमध्ये दिसत आहे . बीएसीवर एफएमसीजी, कनज्यूमर गुड्स, हेल्थकेअर समभागात घट झाली असून निफ्टी, सेन्सेक्स आयटी समभागांच्या निर्देशांकात वाढ पहायला मिळाली आहे. आयपीओ निर्देशकांत देखील वाढ झाली आहे. आज जीपीटी हेल्थकेअरचा आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे