International Mother Language Day 2024 - मातृभाषेतील शिक्षणाची गरज काय?

    21-Feb-2024
Total Views | 93
international mother language day

International Mother Language Day 2024 - २१ फेब्रुवारी १९५२ रोजी बांगलादेश (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) मध्ये एक दुखद घटना घडली. पाकिस्तान सरकारने त्यावेळी बंगाली भाषिक लोकसंख्येच्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेकडे दुर्लक्ष करत उर्दूला एकमेव अधिकृत भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात आंदोलने देखील झाली. मात्र शांततापूर्ण निदर्शनास हिंसक वळण लागले, ज्यामुळे अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला ज्यांनी त्यांची मातृभाषा, बांगला हिचे धैर्याने रक्षण केले. त्यामुळे बांगलादेशात हा दिवस भाषा चळवळ शहीद दिन किंवा बांगलादेशमध्ये शहीद दिबा म्हणून ओळखला जातो, भाषिक हक्कांसाठी केलेल्या बलिदानाचे हे प्रतीक आहे. त्यामुळेच पुढे ह्या दिवसाचे महत्तव लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्राने २१ फेब्रुवारी अर्थात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

तुम्हाला माहितीच असेल, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची नावे आपल्याला सहसा वाचता येत नाहीत. त्याचं कारण म्हणजे डॉक्टरांची लिहिण्याची स्टाईल आणि दुसरं म्हणजे जे औषध लिहून दिलं आहे, ते इंग्रजी भाषेत असतं. परंतु समजा डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध हे मराठीतून असेल तर. आहे की नाही भारी गोष्ट, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश सरकारच्या निर्णयानंतर मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देत मराठीतून MBBS चे शिक्षण करता येईल, अशी घोषणा २०२२ साली महाराष्ट्रातील त्तत्कालीन सरकारने केली. त्यानंतर मातृभाषेतून शिक्षण ह्या मुद्याला अनेकांनी पंसती दर्शवली. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणात ही मातृभाषेच्या शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याची चर्चा झाली. त्यामुळे आज आपण जागतिक मातृभाषा दिनानिमित्त २०२४ या वर्षातील 'बहुभाषिक शिक्षण-शिक्षणात परिवर्तनाची गरज' या थीमनुसार, मातृभाषेतून शिक्षण का गरजेचं आहे? या प्रश्नाबद्दल जाणून घेणार आहोत. 
 
सर्वात आधी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन का, कधी, आणि केव्हापासून साजरा केला जातोयं? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या जनरल कॉन्फरन्सने नोव्हेंबर १९९९ मध्ये सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनांची घोषणा केली. पंरतु २००२ ठरावात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याला औपचारिक मान्यता दिली. मुळात बांगलादेशने हा दिन साजरा करण्याची कल्पना मांडली होती. त्यामुळेच बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेच्या माध्यमातून विविधतेत एकता आणि आंतरराष्ट्रीय समज वाढवण्यासाठी २००८ हे आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून सर्वसाधारण सभेने घोषित केले आणि युनेस्को या वर्षासाठी प्रमुख एजन्सी म्हणून काम केले. त्यानंतर मातृभाषेच्या संवर्धानासाठी वेगवेगळी थीम घेऊन दरवर्षी जगभरात हा दिवस २१ फेब्रुवारी अर्थात आजच्या दिवशी साजरा केला जातो.
 
मग आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, हा दिन साजरा करण्याचा उद्धेश काय? जागतिक स्तरावर झालेल्या अभ्यासानुसार, जगभरात ४० टक्के लोकसंख्येला त्यांना कळणाऱ्या ते बोलत असलेल्या भाषेत अर्थात मातृभाषेत शिक्षण उपल्बध नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने सांगितल्याप्रमाणे दर दोन आठवड्याने क भाषा एक संपूर्ण सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा अलीप्त होते. त्यामुळे जगभरात बोलल्या जाणाऱ्या अंदाजे ६ हजार भाषांपैकी किमान ४३ टक्के षा धोक्यात आहेत. केवळ काही शेकडो भाषांना खऱ्या अर्थाने शिक्षण प्रणाली आणि सार्वजनिक डोमेनमध्ये स्थान देण्यात आले आहे आणि त्याहून भयानक म्हणजे डिजिटल जगात शंभरहून कमी भाषा वापरल्या जातात. त्यामुळे मातृभाषा टिकवणे ही काळाची गरज आहे. अन्यथा माय मारो आणि मावशी जगो, हे आपल्या शिकवलं जातचं. पण आता असं करून चालणार नाही. कारण मातृभाषा ही त्या समुदायाची संस्कृती, पंरपरेचा ऐतिहासिक दस्ताऐवज असतो.भाषेच्याबाबतीत आपल्याकडे सांगितले जाते की, कोस-कोस पर पानी बदले, चार कोस पर वाणी. त्यामुळे असर म्हणजे अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्टच्या अहवालानुसार, २६.४ टक्के मुलांना मातृभाषा वाचता येत नाही. तसेच ५३ टक्के मुलांना इंग्रजी वाचता येत पण ७३ टक्के मुलांना इंग्रजी कळत नाही. त्यामुळे मातृभाषेवर प्रभुत्व नसल्याने इकडे आड अन् तिकडे विहिर अशी विद्यार्थ्यांची परिस्थीती झालेली आहे.

याबद्दल सांगताना शिक्षणक्षेत्रातील प्रशिक्षक आणि भाषा अभ्यासक संदीप वाकचौरे सांगतात की, आपल्याकडे लहान मुलांच्या भाषेचा विचार केला तर, घरची भाषा, परिसर भाषा आणि शाळेची भाषा अशा तीन भाषेमध्ये ते वावरतात. काही मुलांच्या बाबतीत मुलांची घरची भाषा आणि शाळेची भाषा एक असण्याची शक्यता असते. मात्र, बहुतांश मुलांच्या बाबतीत घरची व शाळेच्या भाषेत फरक आहे. त्यामुळे मुलांची भाषा हे शिक्षणाचे माध्यम झाले, तर शिकणे सुलभ होत असते. त्यामुळे त्या मुलांना त्यांना समजणाऱ्या भाषेतून एखादी किचकट गोष्ट जरी सांगितली तरी ती त्यांना पटकन समजते. त्यामुळे मातृभाषा महत्त्वाची आहे. तसेच बऱ्याच वेळा मातृभाषेतून वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण देण्यासाठी इंग्रजीला पर्यायी शब्द काय देणार? अशी ओरड केली जाते. पण एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की, आपण आपल्या दैनंदीन जीवनात पंख्याचं फॅन आणि वीजेचं लाईट हे स्वरुप मातृभाषेत स्वीकारू शकतो. तर वैद्यकीय क्षेत्रातील संकल्पना इंग्रजीतल्या जरी असल्या तरी अवघड गोष्टी सोप्या करून मातृभाषेत समजून घेण्यात काहीचं चुकीचं नाही.

त्यामुळे जर मातृभाषेतून शिक्षण घेतले तर, पहिलं म्हणजे, विचार, वृत्ती, भावना, कल्पना यांच्या आड येणाऱ्या गोष्टींना दूर करण्याची शक्ती मातृभाषेच्या आधाराने मिळते. शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी अवांतर वाचनाची गोडी मातृभाषा माध्यम असल्यास विकसित होते. मातृभाषेतून शिकल्याने मुलांच्या जाणिवा समृद्ध होतात. आकलनशक्ती विकसित आणि मजबूत होते. मातृभाषेत शिकल्याने विचार करणे, विश्‍लेषण करणे, निर्णय घेणे आदी क्षमता विकसित होण्यास मोलाची मदत होते. बोलण्याची/विचार करण्याची व शिक्षणाची भाषा एकच असल्याने शिकणे आनंददायी होते. त्यामुळे मातृभाषेतील शिक्षण हे मुलांच्या सर्वांगिण विकासाचे मार्ग मोकळे करते. त्यामुळेच नवीन शैक्षणिक धोरणात ही मोदी सरकारने मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिले आहे.आज जगातील फ्रान्स वा जर्मनीसारखे प्रगत देश आपापल्या मातृभाषेतच प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन वा इतर कुठलेही वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण देतात. जर्मन किंवा फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपन्यांची ‘बुकलेट’देखील आपापल्या मातृभाषेत दिलेली असतात. जर्मन वा फ्रेंच लोक व्यावहारिक गोष्टींचा आत्माही आपली मातृभाषा मानतात आणि त्याबाबत तडजोड करत नाही, हे यातून स्पष्ट होते.


त्यामुळे वैदिक गणित, शून्याचा शोध, दशमान पद्धतीचा शोध संस्कृत भाषेतच असून पायथागोरसचे प्रमेय शुल्बसुत्रात तर गुप्तकाळातील आर्यभट्टाने आपल्या आर्यभट्टीयम ग्रंथात भूमितीय सिद्धांत आहेत. महाराष्ट्रातल्या भास्काराचाऱ्यांनी गणितात काम करतानाच गुरुत्वाकर्षणाचाही उल्लेख केलेला आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास करूनच भारतीयांनी चांद्र व सौर कालगणना तयार केली, त्यातील आकडेमोडीनेच वर्षानुवर्षांत सूर्यमालेत नेमक्या कोणत्या घटना घडतील याचेही वर्णन केलेले आढळते. आधुनिक भौतिकशास्त्राचा सर्वप्रमुख सिद्धांत अणुवाद असून त्याचा उल्लेख महर्षी कणादांच्या संस्कृत साहित्यात आहे. रसायनशास्त्रात नागार्जुनाचे योगदान उल्लेखनीय असून पार्याचा शोध त्यांनीच लावला. तसेच मेहरोलीतील लोहस्तंभ न गंजता हजारो वर्षांपासून उभा आहे, हे रसायनशास्त्राचेच उदाहरण. भारतीय वैद्यकशास्त्रही संस्कृतमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मातृभाषेत ज्ञानाची प्राप्ती पुर्वजांनी केलेली असताना आपण इतर भाषेतून शिक्षण घेण्यापेक्षा मातृभाषेला प्राधान्य देणं काळाची गरज आहे. इतर भाषेचे ज्ञान महत्त्वाचेच पण मातृभाषेतील शिक्षण ही विचारप्रक्रियेची प्रग्लभता वाढवणारी कल्पना आहे. 



 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121