सीकेटी कॉलेज मध्ये मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न

    21-Feb-2024
Total Views | 27
Mental Health Workshop news
 
पनवेल (प्रतिनिधी )जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अर्थात सीकेटी कॉलेज (स्वायत्त) येथे समुपदेशन कक्ष विभागातर्फे युवा मानसरंग प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, मानसोपचारतज्ञ डॉ. हमीद दाभोलकर आणि त्यांची सहकारी टीम, तसेच स्किल मिल इंडिया प्रा. लिमिटेड चे फाऊंडर झहीर मिर्झा व त्यांची टिम, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकादमी (एम.एस.एफ.डी.ए.)च्या कार्यकर्त्या तोशिता तांडेल, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेचे राज्य सचिव मिलिंद देशमुख हे उपस्थित होते.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केली तसेच पोस्टर्स, आणि मानसिक जनजागृती करणारे स्टॉल्स लावले होते. युवा मानसरंग प्रकल्पाअंतर्गत मानसिक कार्यशाळेमध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. एकंदर ३० स्टॉल्स ची मांडणी करण्यात होती. या मध्ये खाद्यपदार्थांचेही स्टॉल्स मांडण्यात आले होते . एकंदर कार्यक्रमात जवळपास २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 'भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी' हे डॉ. हमीद दाभोलकर यांच्या पुस्तकाचे लोकार्पण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के . पाटील, झहीर मिर्झा, मिलिंद देशमुख आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश वडनेरे यांनी केले.

डॉ. हमीद दाभोलकर यांनी त्यांच्या भाषणात असे नमूद केले की युवा मानसरंग हा तरुणांमधील आत्महत्या थांबवण्यासाठीचा प्रकल्प आहे आणि त्याकरिता मुलांसाठी अत्यंत आवश्यक असलेले कॉउंसेलिंग सेल महाविद्यालयानी उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या सर्व सुविधा या महाविद्यालयामध्ये आहेत. पूर्ण महाराष्ट्रात एकूण ६ कॉलेजेसची हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी निवड केली गेलेली आहे आणि त्यापैकी चांगु काना ठाकूर हे एक कॉलेज आहे. पूर्ण भारतामध्ये असे एकमेव हे कॉलेज आहे जिथे मानसिक आरोग्याची एवढी काळजी केली जाते व त्याला महत्व दिले जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के . पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेत मनाच्या आरोग्याचे आपल्या करिअरशी असलेले संबंध विषद करून मानसिक आरोग्य जपण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. झहीर मिर्झा व त्यांच्या टीम ने कॉउंसेलिंग सेल च्या रूम मध्ये मानसिक आरोग्याचा संदेश देणारी पोस्टर्स लावून रूम चे सुशोभिकरण केले आणि कॉउंसेलिंग रूम ला इमोशनल फर्स्ट एड असे नाव देऊन त्याचे उदघाटन तोशिता तांडेल आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले . श्री. झहीर मिर्झा व डॉ. हमीद दाभोलकर यांनी https://myemotionalfirstaid.org या वेबसाईट वर जाऊन आपली मानसिक स्थिती आपण कशी पडताळून पाहू शकतो हे दाखवले.

या कार्यशाळेत मुलांनी व्यसन, सोशल मीडिया व्यसन, पालक आणि नातेसंबंध, शिक्षण आणि त्याचे मानसिक आरोग्याशी असलेले नाते या विषयावर चार पथनाट्ये व पोस्टर्स उत्तम प्रकारे सादर केली आणि स्टॉल्स वरही मुलांची मानसिक आरोग्य विषयक स्कॅनिंग करून देणारी चाचणी ठेवली होती. जवळ जवळ ८० जणांनी या चाचणी चा लाभ घेतला होता. कार्यक्रमाचा शेवट विद्यार्थी सहभागींना सर्टिफिकेट्स देऊन व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून केला गेला. प्रस्तुत कार्यक्रम पार पाडण्यासाठी कॉउंसेलिंग सेलच्या समुपदेशिका स्वाती परब, प्रा. डॉ. भाग्यश्री भोईर , प्रा. अनिकेत सोनसुरकर, प्रा. सुचित्रा गव्हाळे, प्रा. अनिल नक्ती, प्रा. करण कोळी आणि प्रा. प्रज्योती देसाई यांनी अथक परिश्रम घेतले. हि कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121