"शाहजहान खानला कधी अटक करणार?" - न्यायालयाचा 'ममता सरकार'ला सवाल

    20-Feb-2024
Total Views | 33
 Calcutta high court
 
कोलकाता : संदेशखली अत्याचार प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालच्या ममता सरकारला फटकारले आहे. पश्चिम बंगालमध्ये, पीडितांनी त्यांच्या निवेदनात स्पष्टपणे तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याचे नाव आरोपी म्हणून घेतले असताना तरीही तो मुक्त कसा? असा सवाल कोलकाता उच्च न्यायालयाने बंगाल सरकारला केला.
 
न्यायालयात या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या खंडपीठाने म्हटले की, “समस्येच्या मुळाशी असलेली व्यक्ती अद्याप पकडली गेली नसून ती फरार आहे, हे धक्कादायक आहे. त्याच्यावर हजारो खोटे आरोप आहेत, पण त्यातला एकही खरा असेल तर त्याची चौकशी करावी. तुम्ही लोकांना विनाकारण त्रास देत आहात.”
 
आपल्या निर्णयात म्हटले आहे की, “राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ते लोकप्रतिनिधी आहेत. तो कायद्याचा अनादर करू शकत नाही. १८ दिवस झाले आहेत. या संपूर्ण समस्येचे मूळ असलेला एक माणूस अद्याप फरार आहे. त्याला संरक्षण मिळाले आहे की नाही हे देखील आम्हाला माहित नाही परंतु हे निश्चित आहे की तो पकडला गेला नाही."
 
कोलकाता उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेस नेत्याला अटक न केल्याबद्दल बंगाल सरकारला फटकारले असताना, न्यायालयाच्या खंडपीठाने दि. २० फेब्रुवारी २०२४ बंगालचे विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांना हिंसाचारग्रस्त संदेशखळी येथे जाण्याची परवानगी दिली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121