हिंदूंवर हल्ले होत राहिल्यास आम्ही गप्प बसणार नाही

कोलकत्यात ढाकई जामदानी साड्या जाळत हिंदू आक्रमक

    08-Dec-2024
Total Views | 127
Kolkata

कोलकत्ता : बांगलादेशात घडत असलेल्या अत्याचाराचे पडसाद भारतात दिसून येत आहेत. भारतीय संतप्त जमाव घडत असलेल्या घटनांचा निषेध वर्तवत आहे. बांगलादेशातील हिंदूंवर ( Hindus ) होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून रविवार दि. ८ डिसेंबर रोजी कोलकत्ता येथे निदर्शने करण्यात आली. बंगाली हिंदू सुरक्षा समितीने आयोजित केलेल्या निदर्शनात ढाकई जामदानी साड्या जाळत आंदोलकांनी बांगलादेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

बांगलादेशातील अत्याचाराच्या घटनांच्या वाढत्या प्रमाणाकडे अख्या भारताचे लक्ष वेधत कोलकत्यात निदर्शने करण्यात आली. बंगाली हिंदू संरक्षण संघाने सॉल्ट लेकमधील कोलकत्ता-ढाका आंतरराष्ट्रीय बस टर्मिनस येथील निदर्शनात बांगलादेशी ढाकई जामदानी साड्या जाळण्यात आल्या. याचदरम्यान करुणामयी बसस्थानकात उभ्या असलेल्या व बांगलादेशात जाणाऱ्या बससमोर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये बांगलादेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन आंदोलकांनी केले. याचबरोबर तिरंग्याचा अपमान आणि हिंदूंवर हल्ले होत राहिल्यास भारतीय गप्प बसणार नाहीत, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121