अयप्पा देवाच्या दर्शनास जाणाऱ्या भक्तांच्या बसवर कट्टरपंथींकडून दगडफेक

बसची तोडफोड करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

    07-Dec-2024
Total Views | 48

Lord Ayyappa
 
रायचोटी : आंध्र प्रदेशात भगवान अयप्पाच्या भक्तांना घेऊन जाणाऱ्या बसवर रायचोटी येथे कट्टरपंथींनी हल्ला केला. बसमध्ये भक्तीगीते लावण्यात आली असल्याने भक्तीमय वातावरण तयार झाले होते. यावेळी भक्तांचा आनंदीमय प्रवास सुरू होता. मात्र यावेळी रायचो़टी येथे बसवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
बसमध्ये भक्तीगीते लावण्यात आली होती. यामुळे बसवर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.  भक्तीगीतांचा आवाज देखील मोठा होता असे बोलले जात आहे. यामुळे भाविकांवर दगडफेक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. याकारणाने भाविकांसह बस चालकांना मारहाण करण्यात आली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
 
व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक हे बसभोवती गोंधळ घालत आहेत. बसची तोडफोड करून बसच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यास स्पष्ट होते की, हल्ला करणारा जमाव हा कट्टरपंथी आहे. त्यातील अनेकांनी नमाजी टोप्या परिधान केल्याचे दिसत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121