मुंबई, दि.७ : विशेष प्रतिनिधी वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट पहिला प्रोटोटाइप तयार करण्यात आला असून त्याची फील्ड ट्रायल घेण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेच्या सभागृहात निवेदन दिले. यावेळी ते म्हणाले, सध्या लांब आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी नियोजित वंदे भारत स्लीपर ट्रेन सुसज्ज आहेत. आधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रवासी सुविधासह या ट्रेन सज्ज आहे.
मध्यम अंतराच्या वंदे भारत ट्रेन सेवेबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, दि. ०२ डिसेंबर २०२४ पर्यंत भारतीय रेल्वे नेटवर्कवर चेअर कार कोचसह १३६ वंदे भारत ट्रेन सेवा धावत आहेत. यापैकी १६ वंदे भारत एक्सप्रेस सेवा तामिळनाडू राज्यातील गरजा पूर्ण करत आहेत. सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेन सेवा दिल्ली आणि बनारस दरम्यान धावत असून, ७७१ किमी अंतर आहे. ते पुढे म्हणाले की, वंदे भारत सेवा आणि तिचे प्रकार यासह नवीन रेल्वे सेवांचा परिचय ही भारतीय रेल्वेवर वाहतूक औचित्य, परिचालन व्यवहार्यता, संसाधनांची उपलब्धता इत्यादींच्या अधीन चालू असलेली प्रक्रिया आहे.