‘सूर्यकिरण’ संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय लष्कराचे पथक रवाना

भारत – नेपाळदरम्यानचा विशेष युद्धसराव

    28-Dec-2024
Total Views | 38
Indian Army

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे ( Indian Army ) ३३४ जवानांचे पथक शनिवारी भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झाले. भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या यशस्वी नेपाळ भेटीनंतर आणि नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्डेल यांच्या भारत दौऱ्यानंतर सूर्यकिरण सराव आयोजित करण्यात आला आहे.

हा सराव नेपाळ मध्ये सालझंडी इथे ३१ डिसेंबर २०२४ ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. दोन्ही देश आलटून पालटून दरवर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करतात. भारतीय लष्कराच्या पथकाचे नेतृत्व ११ गोरखा रायफल्स बटालियन करत आहे. नेपाळच्या लष्करी पथकाचे नेतृत्व श्रीजुंग बटालियनकडे आहे.

जंगलातील युद्धकौशल्य, पर्वतीय प्रदेशातील दहशातवादविरोधी कारवाया आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार आपत्ती काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून केली जाणारी मदत यामध्ये संयुक्त कार्यक्षमता बळकट करणे हे सूर्यकिरण सराव आयोजनाचे उद्दीष्ट आहे. या सरावात कार्यसज्जता वाढविणे, वैमानिक प्रशिक्षण पैलू, वैद्यकीय प्रशिक्षण आणि पर्यावरण रक्षण यावर भर दिला जाईल. या प्रशिक्षणाद्वारे दोन्ही देशांची लष्करी पथके आपली प्रत्यक्ष कार्यक्षमता वाढवतील, युद्धकौशल्यांमध्ये आणखी सुधारणा करतील आणि आव्हानात्मक परिस्थितीत एकत्र काम करण्यासाठी परस्पर सहकार्य मजबूत करतील.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121