जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

    26-Dec-2024
Total Views | 97
former pm dr manmohan singh passed away


नवी दिल्ली :   भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री नवी दिल्ली येथे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ते सलग दहा वर्षे भारताचे पंतप्रधान होते. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सने त्यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर वृद्धपकाळामुळे उपचार सुरू होते. दिनांक 26 रोजी ते आपल्या घरी अचानक बेशुद्ध पडले, त्यानंतर त्यांना रात्री आठ वाजून सहा मिनिटांनी एम्स येथे दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर आपत्कालीन उपचार तत्काळ सुरू करण्यात आले, मात्र त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिले नाही आणि रात्री नऊ वाजून 51 मिनिटांनी त्यांचे निधन झाले, अशी माहिती एम्स तर्फे देण्यात आली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग हे सलग दहा वर्षे देशाचे पंतप्रधान होते. 2004 साली काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीस बहुमत मिळाले, त्यावेळी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्यात आले. पुढे 2009 साली त्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीने पुन्हा बहुमत मिळवले आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते.

डॉक्टर मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ञही होते. डॉ.मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ञ होते. 1991 मध्ये त्यांनी देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थमंत्री म्हणून त्यांनी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणे राबवून भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मविभूषणसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 1991 मध्ये पीव्ही नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला आकार दिला. त्यांनी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणे स्वीकारली. या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेसाठी खुली झाली. यामुळे खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळाले आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित झाली. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ झाली होती.

देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. अखेर वयाच्या ९२व्या वर्षी उपचारादरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांची प्राण ज्योत मालविली. त्यांच्या निधनाने देशाने जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ आज गमावला आहे. एकेकाळी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही व २००८ साली जागतिक मंदीत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याच सक्षम आर्थिक धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेस मजबूती मिळाली होती.

२००४ ते २०१४ सलग दहा वर्ष डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषविलं. जगभरात अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी ख्याती मिळविली. आरबीआयचे गव्हर्नर म्हणूनही त्यांनी चोख कामगिरी बजावली होती. विशेष म्हणजे १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मनमोहन सिंग यांनी केंद्रीय अर्थमंत्र्याची जबाबदारी पार पाडली होती. याच काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून देशात प्रतिमा बनली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारतातील सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने शोक व्यक्त होत आहे. सामान्य कुटुंबातून उदयास आलेले ते एक प्रसिद्ध अर्थतज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्र्यांसह विविध सरकारी पदे भूषवली आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या आर्थिक धोरणावर एक मजबूत छाप सोडली. त्यांचा संसदेतील हस्तक्षेपही व्यावहारिक होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.
 

 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121